Search This Blog

Saturday, 4 August 2018

ॲथेन्सला ब्रम्हपुरीचे दोन आदिवासी कराटेपटू जाणार मिशन शक्तीला ना.सुधीर मुनगंटीवार यांचे पाठबळ

 चंद्रपूरदि.3 ऑगस्ट- मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरु करुन आदिवासी  विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारात प्रोत्साहन देण्याच्या वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या योजनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथील  ऋषिकेश येरमे आणि विजयालक्ष्मी येरमे या दोन आदिवासी विद्यार्थ्यांचा ग्रीस देशातील थेन्स येथील प्रवास निश्चित झाला आहे. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतंर्गत आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पींयनशिप स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरीच्या दोन आदिवासी विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
         महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर यांच्याकडे हा निधी वळता करण्यात आला आहे. मिशन शौर्यनंतर आणखी दोन मुले आपला पराक्रम विदेशात दाखविण्यासाठी रवाना होत असल्याचा आनंद राज्याचे वित्तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणून आदिवासी विकास विभागाने ऋषीकेश व विजया लक्ष्मी येरमे या दोन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप 2018 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी अडीच लाख अशी एकूण पाच लाख रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.
         चंद्रपूरगडचिरोली व परिसरातील आदिवासी मुलांना काही विशिष्ट खेळामध्ये प्राविण्य देवून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळविण्यासाठी तयार करण्याचे ना.मुनगंटीवार यांनी जाहिर केले आहे. चंद्रपूर जिल्हयात तयार होणा-या नव्या क्रीडा संकुलाचा व सुविधांचा वापर या भागातील वंचित घटकाला मोठया प्रमाणात व्हावा व त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्हावाअशा सूचना त्यांनी दिल्या आहे. ब्रम्हपूरी परिसरातील या दोन  कराटे पटूंनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले व आपल्या परिसराचे नांव लौकिक वाढवावेअशा शुभेच्छा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी  दिल्या आहेत.
                                                          000

No comments:

Post a Comment