Search This Blog

Monday 6 August 2018

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे - जितेंद्र पापळकर जिल्हा परिषद चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विशेष मुलाखत

चंद्रपूर (प्रतिनिधी) : दिनांक 3.8.2018 देश भरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण च्या मुल्यांकना साठी केंद्र सरकार कडून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 या द्वारा गावाची तपासणी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट 2018 या कालावधीत केली जाणार असून, जिल्हा परिषद चंद्रपूर स्वच्छ सर्वेक्षण 2018 जोमाने काम करीत आहे. या विषयी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. मुलाखती द्वारा जिल्हा परिषद द्वारा स्वच्छ सर्वेक्षण 2018 ग्रामीण वर भर देण्यात आला आहे.
जिल्हयात एकूण 827 ग्रामपंचायती असून, जिल्हा पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त झाला आहे. केंद्र सरकार कडून, स्वच्छ भारत मिशन द्वारा ग्रामस्तरावर स्वच्छते विषयी बहुअंगाने तपासणी केली जाणार आहे. जिल्हयातील एकूण ग्रामपंचायतीच्या कुठल्याही 10 ते 16 ग्रामपंचायतीची पूर्णत: तपासणी केंद्रीय पथकाद्वारे होईल.
केंद्र सरकार कडून निवडलेल्या सर्वेक्षण संस्थेकडून पहिल्या टप्प्यामध्ये सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरिक्षण करण्यात येईल. यामध्ये शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सर्व प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे आणि इतर महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश असेल.
गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा वर्कर आणि शिक्षक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील. सर्वक्षणातील निवडलेल्या ग्रामपंचायती मधील कुठल्याही दहा सामान्य ग्रामस्थांकडून प्रतिक्रिया घेण्यात येतील. यासाठी गावस्तरावर वेगवेगळया ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात येतील.
यासोबत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या संकेत स्थळावरील माहिती प्रणालीच्या आधारे वैयक्तिक शौचालय सुविधांची उपलब्धता व वापर याबाबतची माहिती घेण्यात येईल. त्याच बरोबर प्रत्येक्ष ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या मदतीनेही माहिती घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने विकसित केलेल्या मोबाईल ॲप ssg2018 वर नोंदवलेल्या प्रतिक्रिया सुधारणा विचारात घेतल्या जातील. या प्रकारची स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 ची तपासणीची कार्यपध्दती राहणार आहे.
वेगवेगळया समुहासोबत किंवा घटकांसोबत चर्चा करुन, तसेच निरिक्षणाद्वारे आणि संकेत स्थळावरून घेतलेल्या माहितीचे एकत्रित संकलन संस्थेकडून करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील स्वच्छते बाबतच्या सर्वांगीन घटकांचा आधार असेल यामध्ये विचार करायचा झाला तर,स्वच्छ सर्वेक्षणाच्या वेळी स्वच्छ सर्वेक्षणाबाबतची माहिती आणि जागृती, गावस्तरावरचे स्वच्छतेबाबत माहिती देण्यासाठी घेतलेले उपक्रम, वैयक्तिक शौचालय उपलब्धती व वापर, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता गृहांची उपलब्धता व वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावस्तरावर असलेल्या सुविधा आणि त्याबाबतची ग्रामस्थांची जागृती, घनकचरा व्यवस्थापनासाठी गावस्तरावर जागृती, स्वच्छतेबाबत गावातील प्रत्येकाची माहिती व त्यादृष्टिने असलेले ग्रामस्थांचे वर्तन, नादुरूस्त असलेल्या शौचालयांना दुरूस्त करून वापरात आणणे, ग्रामपंचायतीकडून हागणदारीमुक्त गावांची घोषणा व तपासणी, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत उभ्या राहिलेल्या व ग्रामपंचायतीकडून विकसित करण्यात आलेल्या स्वच्छता सुविधांचे जिओ टॅगिंग. यासर्व बाबी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण ची तपासणी यावर आधारभूत राहील.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ssg2018 या नावाचे ॲप या द्वारा ग्रामीण भागातील ॲनराईड मोबाईल वापरणाऱ्या कडून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विषयी प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. आपण दिलेल्या प्रतिक्रियांचा केंद्र सरकार स्तरावर विचारात घेतल्या जाणार आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी या ॲपचा वापर करून आजच प्रतिक्रिया नोंदवावी व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये गावातील सर्व घटकांनी मनापासून सहभागी होवून चंद्रपूर जिल्हाचे चांगले गुणांकन हेाण्याच्या दृष्टिने प्रथम कर्तव्य म्हणून मोलाची भूमिका पार पाडावी. असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या विशेष मुलाखती द्वारे केलेले आहे.
- कृष्णकांत खानझोडे, स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परीषद, चंद्रपुर.

No comments:

Post a Comment