Search This Blog

Saturday, 4 August 2018

गुलाबी बोंड अळीवर वेळीच फवारणी करण्यात यावी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांचे शेतकऱ्यांना आवाहन


चंद्रपूरदि 30 जुलै : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता गेली काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचना आहे. त्यामुळे पाती लागायला सुरूवात झाल्यावर किंवा 45 दिवसांनंतर गुलाबी बोंड अळीचे पतंगाचे पाहणी करावी आणि फवारणी करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी सूचना चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केली आहे.
सोमवारी बोंडअळी संदर्भातील जनजागरण करणाऱ्या  चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवताना त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्य शासनाच्या मार्फत गुलाबी बोंड अळी पासून कपासीचे संरक्षण व्हावेयासाठी अनेक मोहीम राबवली जात आहे.यासाठी सर्वत्र जनजागरण करण्यात येत आहे. गेल्या वर्षी कपाशीचे पीक घेऊ नयेअशा पद्धतीचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते. तरीही अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी आपल्या जमिनी मध्ये लाखो हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केलेली आहे. मात्र आता पेरणी केल्यानंतर 40 ते 45 दिवसांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवण्याचे आव्हान जिल्हा धीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. जर पाती लागायला सुरुवात झाली असेल आणि 45 दिवसांनंतर गुलाबी बोंडअळीच्या पतंगाची अस्तित्व दिसून येत असेल तर मात्र फवारणी करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट प्रतिपादन केले आहेयासाठी त्यांनी काही किटकनाशकांची देखील शिफारस केली असून प्रति लिटर पाण्यामध्ये 2 मिलीलीटर क्वीनॉलफॉस, थायोडीकार्बक्लोरोपायरी फॉस, सायपरमेथ्रीन आदी किटकनाशके योग्य प्रमाणात वापरण्याचे त्यांनी मार्गदर्शन केले आहे. फवारणी करताना त्यांनी खालील प्रकारे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शिफारस केलेलीच कीटकनाशके परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करून त्याची फवारणी करण्याबाबत त्यांनी सूचना केली आहे. गेल्यावर्षी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्याचे दुर्घटना घडली होती. या दुर्घटना टाळण्यासाठी फवारणी करताना संरक्षक पोषाख, बूट हातमोजेनाकावरील मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. जिल्हाभरात फिरणाऱ्या चित्ररथाच्या मार्फत गुलाबी बोंड अळीची ओळख व जीवनक्रम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या गावामध्ये येणाऱ्या चित्ररथाचे स्वागत करावे व वाटण्यात येणाऱ्या पत्रकांच्या मार्फत गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय घ्यावाअसेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
                                                       0000

No comments:

Post a Comment