Search This Blog

Saturday, 31 May 2025

लोणकर व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा


लोणकर व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा

चंद्रपूरदि. 31 मे : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमजिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व इंडियन डेंटल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम लोणकर व्यसनमुक्तीउपचार व पुनर्वसन केंद्रआरवट येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

यावर्षीचा संदेश होता - "आकर्षणाचा मुखवटा उतरवूया : तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करूया". कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढवणे व COTPA 2003 (सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा-२००३) याची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देणे असा होता.

कार्यक्रमात डॉ. राजेश टोंगे (इंडियन डेंटल असोसिएशन) यांनी व्यसनांमुळे जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. श्वेता सावलीकर (जिल्हा सल्लागारतंबाखू नियंत्रण कार्यक्रम) यांनी तंबाखूच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे परिणाम व तंबाखू उद्योगांच्या फसव्या प्रचाराची माहिती दिली. तसेच मौखिक कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आकाश कासटवार यांनी मुख कर्करोगाची लक्षणेसुरुवात व उपचार पद्धती स्पष्ट केली.

समुपदेशक मित्रांजय निरंजने यांनी व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपचार व पुनर्वसन सेवांविषयी माहिती दिली.  तुषार रायपूरे यांनी उपस्थित नागरिकांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. सर्व उपस्थितांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ. राजेश डोंगरे (प्रेसिडेंट, IDA), डॉ. पियुष लोधे (सेक्रेटरी)डॉ. भार्गव भांडेडॉ. अमर दुर्योधनडॉ. आकाश कासटवारडॉ. श्वेता सावलीकरमित्रांजय निरंजने व तुषार रायपूरे यांचा मोलाचा सहभाग होता. आयोजकांनी तंबाखूमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला असूनयुवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावेअसे आवाहनही यावेळी करण्यात आले.

00000000

Friday, 30 May 2025

पालकमंत्री डॉ. अशोक उईके 2 जून रोजी चंद्रपुरात

 


पालकमंत्री डॉ. अशोक उईके 2 जून रोजी चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 30 मे : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 2 जून 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 2 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीस उपस्थिती, दुपारी 1 ते 2 या वेळेत नियोजन भवन चंद्रपूर येथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकरीता राखीव, दुपारी 2 वाजता नागपूरकडे प्रयाण.

००००००

1 जून रोजी उघडणार चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे

 

जून रोजी उघडणार चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे

            चंद्रपूर,दि. 30 मे : वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यात चिचडोह बरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले आहेसदर बॅरेजची एकूण लांबी 691 मीअसून 15 मीटर लांब आणि मीउंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. 15 ऑक्टोबर 2024 पासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होतेपावसाळ्यातील पूर नियंत्रणाच्या दृष्टीने बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे जुन 2025ला उघडण्याचे नियोजित आहे.

सद्यस्थितीत पाणी पातळी 183 मीव जिवंत साठा 53.52 ...मीइतका आहेत्या अनुषंगाने जून 2025 रोजी सकाळी वाजता प्रकल्पाचे उभ्या उचल द्वारातून / River Sluice मधून 472.84 क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असून टप्याटप्याने सदर विसर्ग वाढविण्यात येणार आहेत्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहेवाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदी लगतचे सर्व गावांना / ग्रामपंचायतीना सूचना देण्यात येते कीसदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्क राहावेमार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरू नदीवर आंघोळ करणारेमासेमारी करणारेनदीघाटातुन रेती काढणारेपशुपालकनदीतून ये-जा करणा-या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रा.मोरघडे यांनी केले आहे.

चिचडोह बॅरेजचे बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधीत होणा-या व नदी काठावरील गावांची यादी : सावली तालुक्यातील हरांबा कढोली,उमरी काजळवाहीडोनाळा मालडोनाळा चकवढोली  गाडंलीवढोली चकपेडगांवसोनापूरसामदावाघोली बुटीव्याहाड (बु.), लोंढोलीउसेगांवकापसीउपरी.

००००००

Thursday, 29 May 2025

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे प्रतिपादन

 

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे  प्रतिपादन

चंद्रपूरदि. 29 मे: आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विभागाला शासनामार्फत एकूण 17,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. मात्रचालू वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने विभागासाठी 21,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या अनुषंगानेमागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीमध्ये स्पष्टपणे वाढ करण्यात आली असूनत्यामुळे आदिवासी विभागाच्या कोणत्याही योजनेस निधीअभावी खंडित करावे लागणार नाहीअसेही मंत्री डॉ. उईके यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. केंद्र सरकारकडूनही आदिवासी विभागास 100 टक्के पाठिशी असून केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या विविध योजनासाठी देखील अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे.

"त्यामुळे निधी कमी केल्याचा किंवा योजना बंद केल्याचा कुठलाही अपप्रचार चुकीचा असूनतो तत्काळ थांबवावा," असे आवाहन डॉ. उईके यांनी यावेळी केले..

0000000

छत्तीसगडच्या 39 प्रशिक्षणार्थी वन अधिकाऱ्यांचा चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे दीक्षांत समारंभ


 

छत्तीसगडच्या 39 प्रशिक्षणार्थी वन अधिकाऱ्यांचा चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे दीक्षांत समारंभ

चंद्रपूरदि. 29 मे : येथील वन प्रशासनविकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन अकॅडमी) या  प्रशिक्षण संस्थेत छत्तीसगड राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी बॅच-2 (2023-25) यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात 39 प्रशिक्षणार्थींनी 18 महिन्यांचे कठोर प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत वन अधिकारी’ म्हणून पुढील सेवेसाठी सज्ज झाल्याची घोषणा करण्यात आली.

या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये 26 पुरुष व 13 महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)  शोमिता बिस्वास उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधनशिक्षण व प्रशिक्षण)  एम. श्रीनिवास रेड्डी तर विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नाविद शुजाउद्दीन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षणक्रमात 19 शैक्षणिक विषय आणि 7 प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश होतातर 5 मोठ्या अभ्यास दौऱ्यांमधून संपूर्ण भारतातील जैवविविधता व वनसंवर्धनाच्या क्षेत्रातील अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना मिळाले. अभ्यास दौऱ्यामध्ये हिमालयीन देवदार जंगलांपासून ते सुंदरबनच्या मॅंग्रोव्ह्सओडिशातील कासव संवर्धनदक्षिणेतील व्याघ्र प्रकल्पवाळवंटी जंगल व्यवस्थापनापर्यंतचा व्यापक अभ्यास करण्यात आला.

या बॅचमधील 30 प्रशिक्षणार्थींनी 75 % पेक्षा अधिक गुण मिळवून ऑनर्स’ प्राप्त केले. यात दिनेश कुमार साहू यांनी 87.30 % गुण मिळवून प्रथम क्रमांकासह ऑनर्स पदक आणि तीन विभागांतील रौप्यपदके पटकावली.  अंतरंग पांडे  यांनी परिस्थितिकी विषयात विशेष प्राविण्य मिळवले.

आपल्या भाषणात संचालक श्री. रेड्डी यांनी सांगितले कीही तुमच्या सेवापथाची सुरुवात आहे. ज्ञानसंवेदनशीलता आणि नेतृत्वगुण हेच खरे वनअधिकाऱ्याचे ओळखचिन्ह आहेत. त्यांनी विज्ञानाधिष्ठित धोरणे आणि समुदाय-संवर्धनाभिमुख दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.

समारोपाच्या भाषणात त्यांनी पुढे सांगितलेछत्तीसगडची जंगले पवित्र आहेत. ही सेवा केवळ नोकरी नसून वन्यजीवपर्यावरण व समुदायांप्रती असलेली जबाबदारी आहे. तुम्हीच हरित प्रशासनाचे भविष्य आहात.

००००००

Wednesday, 28 May 2025

पाऊस थांबल्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण

 पाऊस थांबल्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण

Ø गोंडपिपरी तहसीलदारांचे स्पष्टीकरण

चंद्रपूरदि. 28 मे : ‘घरकुल लाभार्थी दिवसभर थांबून रिकाम्या हाताने परतले’ याबाबत गोंडपिपरीचे तहसीलदार यांनी स्पष्टीकरण दिले आहे कीगत तीन चार दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहेत्यामुळे मंजूर घरकूल लाभार्थ्यांना वाळू वितरण करतांना अडचण निर्माण होत असून पाऊस थांबल्यानंतर आणि रस्ते पुर्ववत झाल्यानंतर मंजूर घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण तात्काळ सुरू करण्यात येईलअसे गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बाहेकर यांनी स्पष्ट केले आहे.

००००००

जिल्हा संसाधन व्यक्ती पदाकरीता अर्ज आमंत्रित

 

जिल्हा संसाधन व्यक्ती पदाकरीता अर्ज आमंत्रित

Ø प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

चंद्रपूरदि. 28 मे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सन 2025-26 करीता जिल्हा संसाधन व्यक्ती (District Resource Person) यांचे सेवाविविक्षित कामांसाठी घेण्यासंदर्भात 31 मे 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत "प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासुची तयार करावयाची आहेत्यासाठी योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील अटी व शर्तीनुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक अर्हता : नामांकित राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठसंस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञानअन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी सीए,तसेच सर्व प्रकारच्या पदवीधारक इत्यादी.

अनुभव : अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन/वृध्दी नविन उत्पादन विकसीत करणेउत्पादनाच्या गुणवत्तेची हमीअन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील 3 ते 5 वर्षाचा अनुभवडीपीआर बनविण्याबाबत अनुभवी सीएसेवानिवृत्त बँकर्स इ.

सदर पदाकरीता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 मे 2025 आहेयोजनेच्या मार्गदर्शक सूचनाअर्जाचा नमुनासविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधनव इतर अटी व शर्ती या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारीचंद्रपूर यांचे कार्यालयात तसेच कृषी विभागमहाराष्ट्र शासन यांचे अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in यावर सुध्दा उपलब्ध आहेतअसे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.

००००००

निःशुल्क व निवासी मॉड्यूलर फर्निचर व फेब्रीकेशन प्रशिक्षण कार्यक्रम


 निःशुल्क व निवासी मॉड्यूलर फर्निचर व फेब्रीकेशन प्रशिक्षण कार्यक्रम

चंद्रपूरदि. 28 मे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूर द्वारा विशेष सामू‌हिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता नागपूर येथे 45 दिवसांचे निःशुल्क व निवासी मॉड्यूलर फर्निचर व फेब्रीकेशन प्रशिक्षण कार्यक्रम जून ते 16 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेसदर प्रशिक्षणाची माहिती लोकांना मिळावी याकरिता उद्योजकता विकास केंद्रउद्योग भवनबसस्थानक समोर चंद्रपूर येथे एकदिवसीय उद्यो्जकीय परिचय कार्यक्रम जून रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

            सदर कार्यक्रमाअंतर्गत मॉड्यूलर फर्निचरइमारत बांधकामलाकूडअल्युमिनियम व पीव्हीसीसुरक्षा खबरदारीहॅन्ड टूल्स आणि लाकूडमॉड्यूलर किचनलाकूड कोरीव कामलाकूड फिनिशिंगअडव्हांस वूड वर्किंग मशीनउद्यो जकीय व्यक्तिमत्व विकासउद्यो गसंधी मार्गदर्शनउद्यो गाची निवडयशस्वी उद्योजकांचे अनुभव कथनशासनाच्या व महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहितीजिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज विषयक योजना व निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता नाव नोंदणी करण्यात येणार आहेकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी केले आहे.

तरी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व नोंदणी करिता 07172- 274416 / 9637536041 व मिलिंद कुंभारे ( मो. 9011667717) निनाद रामटेके (मो. 8605075370) यांच्याशी संपर्क करावा.

००००००


परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका


 परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका

चंद्रपूरदि२८ मे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन नोंदणी MH-३४, CQ-०००१ ते MH-३४,CQ-९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे

           ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जून 2025 पूर्वी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करावायानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्क प्रादेशिक परिवहन अधिकारीचंद्रपूर यांचे नावे (DD) भरणा मालिका सुरू झाल्यावर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत.

तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. सदर मालिका चालू असतांना वाहन ४.० प्रणाली कार्यान्वयीत  झाल्यातर बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावीनविन मालिका जून 2025 पासून सुरू करण्यात येईलअसे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

००००००

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि अवलंबितांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन


माजी सैनिकमाजी सैनिक विधवा आणि अवलंबितांनी  महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 28 मे सर्व माजी सैनिकमाजी सैनिक विधवावीर मातावीर पिता यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहेमहाडीबीटी पोर्टलवर डाटा नोंदणी करावयाचा असल्यामुळे सर्वांनी आपले आधार कार्डपॅन कार्डबँक पासबुकची छायांकीत प्रत व माहिती त्वरीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे आणून द्यावी.

जे माजी सैनिकमाजी सैनिक विधवावीर मातावीर पिता माहिती आणुन देणार नाहीत्यांना यापूढे कोणतेही लाभ किंवा सुविधा मिळणार नाही, याची नोंद घ्यावीज्यांना माहिती देतांना काही समस्या वाटत असेल त्यांनी 07172- 257698 किंवा कल्याण संघटक सुरेश पंढरीनाथ पगार (मो. 9098067972) वर संपर्क साधावा, किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांकावर माहिती पाठवावीअसे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने  कळविले आहे.

००००००

Tuesday, 27 May 2025

वर्षभरात अवैध दारुशी संबंधित 1668 आरोपींना अटक

 

वर्षभरात अवैध दारुशी संबंधित 1668 आरोपींना अटक

Ø 150 च्या वर दारू दुकानांवर कारवाई

चंद्रपूरदि. 27 मे : मागील वर्षभरात जिल्ह्यात अवैध दारुची निर्मितीत्याची वाहतूक व विक्री करणा-या 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहेतसेच नियमांचे उल्लंघन करणाया 151 दारु दुकानांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 129 अनुज्ञप्त्यांधारकांना एकूण 47 लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आलातर 15 दुकाने 5 ते 15 दिवसांपर्यंतच्या कालावधीकरिता निलंबित ठेवण्यात आली आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात 963 गुन्ह्यात 773 आरोपींना अटक केली होतीत्यांच्या ताब्यातून 42 वाहनांसह 98 लक्ष 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होतात्या तुलनेत 2024-25 या आर्थिक वर्षात अवैध दारुविरुद्ध केलेल्या कारवाईत दुपटीने वाढ झाली आहेया कालावधीत अवैध दारुची निर्मितीविक्रीवाहतूक करणा-यांविरोधात नोंदविलेल्या 1840 गुन्ह्यात 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहेत्यांच्या ताब्यातून 135 वाहनांसह कोटी लक्ष 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेतसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 93 अन्वये सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यासाठी 249 प्रस्ताव सर्व उपविभागीय दंडाधिका-यांकडे पाठविण्यात आले आहेत

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्री दुकानांचे अचानकपणे निरिक्षण केले जाते व नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास विसंगती प्रकरण नोंदवण्यात येतेमागील वर्षभरात (एप्रिल 2024 ते मे 2025) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 151 अनुज्ञप्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले होतेही विसंगती प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईस्तव सादर केली असता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी 129 प्रकरणात प्रत्येकी 25 ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला असून गंभीर प्रकरणात दारु दुकानांचे व्यवहार 15 दिवसांपर्यत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेतमागील वर्षभरात नोंदविलेल्या प्रकरणात नियमांचे भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांना एकूण 47 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133  वर नोंदवावीअसे आवाहन  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.

००००००

10 वी व 12 वी परीक्षेत अव्वल आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयातर्फे सत्कार



10 वी व 12 वी परीक्षेत अव्वल आलेल्या

आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयातर्फे सत्कार

           चंद्रपूरदि. 27 मे :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 8 शासकीय, 24 अनुदानित व एकलव्य आश्रम  शाळा चालविल्या जातात.  शैक्षणिक सत्र 2025 पासून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनीसंपूर्ण प्रकल्पातील शासकीयअनुदानित/एकलव्य आश्रम शाळेतुन इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत आलेल्य पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे,

त्या अनुषंगाने प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथे नुकताच विद्यार्थीपालकमुख्याध्यापक व शिक्षक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आलाकार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर प्रमुख अतिथी म्हणून गिरीश पोळ (सहाप्रकल्प अधिकारी), राजीव बोंगिरवार (सहा प्रकल्प अधिकारी), राजेश धोटकर (सहाप्रकल्प अधिकारी), कार्यालयातील सर्व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी प्रकल्प अधिकारी श्रीराचेलवार म्हणालेबोर्डाच्या परिक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रथमच सत्कार करण्यात आला आहेविद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहेदरवर्षी प्रकल्पात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. असे त्यांनी सांगितलेतसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना 10 व 12 वी नंतर करीअर निवडीचे मार्गदर्शन केले.

             इयत्ता 10 वी तील गुणवंत विद्यार्थी : 1) शितल भुजंगराव कन्नाकेप्रथम (अनुदानित आश्रम शाळाराजुरा) 2) सानिया छबिलदास सिडाम द्वितीय (अनुदानित आश्रम शाळाराजुरा), 3) आराधना अनिल कुंभरे तृतीय (अनुदानित आश्रम शाळासरडपार)

इयत्ता 12 वी (विज्ञानमधील गुणवंत विद्यार्थी : 1) अमन दिपक कोडापेप्रथम (अनुदानित आश्रम शाळाभारी 2) दिपाली कैलास येरमे द्वितीय (अनुदानित आश्रम शाळागडचांदूर)

इयत्ता 12 वी (कलामधील गुणवंत विद्यार्थी : 1) सुशिला विजय गावडे ,प्रथम (अनुदानित आश्रम शाळासरडपार) 2) विद्या सुर्यभान आत्राम,द्वितीय (शासकीय आश्रम शाळादेवाडा)

          ०००००० 

जीएमसी व सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन


 जीएमसी व सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन

         चंद्रपूरदि. 27 मे :  जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमसामान्य रुग्णालयचंद्रपुर व कर्मवीर मासांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन सामान्य रुग्णालयात साजरा करण्यात आलाउद्घाटक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉमिलिंद कांबळे अध्यक्ष म्हणुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव चिंचोळे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेमानसिक रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉमनिष ठाकरेअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉभास्कर सोनारकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. कांबळे म्हणालेमानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मन स्वस्थ ठेवावेमनाची व्दिधा मनस्थिती असल्यास मानसिक आरोग्य ढासळतेतसेच चिंता मुक्त जीवन जगावेडॉचिंचोळ म्हणाले, मानसिक ताण तणावात जास्त काळ न राहता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावाफार चिंताग्रस्त जीवन जगु नये व छोटया छोटया गोष्टीत आनंद मिळवावा. जे आहे त्यात समाधान मानावेतरच मानसिक आरोग्य व्यवस्थीत राहीलयावेळी डॉ संदीप भटकरडॉसायली दाबेरावडॉ प्रियंका मून यांनी स्किझोफ्रेनिया आजाराविषयी मार्गदर्शन केले.

मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी कुठेही संकुचित भावना ठेऊ नयेतसेच मानसिक आरोग्यासाठी भारत सरकारव्दारे टेलीमानस राबविण्यात येतोटोल फ्री क्रमांक. 14416/18008914416 या नंबर वर मोफत मानसिक आरोग्य मार्गदर्शन व सल्ला समुपदेशन 20 पेक्षा अधिक भाषामध्ये करण्यात येतेयाचा लाभ सर्व जनतेनी घ्यावाअसे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांनी केले.

      जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त शासकिय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी पथनाटयातुन मानसिक स्वास्थ विषयक माहिती दिलीसमाजसेवा अधिक्षक उमेश आडे व मेट्रन माडवकर व मेट्रन आत्राम यांनी कार्यकमाची धुरा सांभाळली. कार्यकमाचे संचालन अतुल शेंदरे यांनी तर आभार दुर्गाप्रसाद बनकर यांनी मानलेयावेळी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम मधील सूरज बनकरउपा गजभियेमित्रंजय निरजंने, रामटेके सिस्टरसरकार सिस्टरशासकिय नर्सिंग कॉलेजचे विदयार्थी तथा रुग्णकर्मचारी व समाजसेवा विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

            फोटो कॅप्शन : मार्गदर्शन करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे

००००००

100 टक्के अनुदानावर सोयाबीन पिकाचे बियाणे


 100 टक्के अनुदानावर सोयाबीन पिकाचे बियाणे

Ø महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 27 मे सन 2025-26 करिता राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर बियाणे मिळणार आहेप्रमाणित बियाणे वितरण या बाबी अंतर्गत मोफत सोयाबीन बियाणे शेतक-यांना उपलब्ध करून दिले जात आहेया योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील संकेत स्थळावर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

             शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे पूर्णपणे मोफत मिळणार आहेया योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळणार आहेविशेषतः सोयाबीन लागवडीसाठी येणारा बियाण्याचा खर्च पूर्णपणे वाचणार असल्याने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज : या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहेशेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतांना Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे.

तालुकास्तरावर उपलब्धता : वितरीत करण्यात येणारे (5 वर्षाच्या आतीलबियाणे प्रत्येक तालुक्यातील अधिकृत डीलरकडे उपलब्ध करून दिले जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे प्राप्त करता येईल.

लाभ क्षेत्राची मर्यादा : या योजनेचा लाभ किमान 20 आरम्हणजे 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी घेता येईलबीबीएफ / रुंद वरंबा सरीटोकन पद्धतीने लागवडी करिता एकरी 22 किलो याप्रमाणे एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त  बॅगचा लाभ दिल्या जाईल,  असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

तूर व सोयाबीनचे प्रात्यक्षिककरिता 100 टक्के अनुदानावर मोफत बियाणे

 गट पीक प्रात्यक्षिके


तूर व सोयाबीनचे प्रात्यक्षिककरिता 100 टक्के अनुदानावर मोफत बियाणे

       चंद्रपूरदि. 27 मे गट पीक प्रात्यक्षिके अंतर्गत तूर व सोयाबीन पिकाच्या प्रात्यक्षिककरीता 100 टक्के अनुदानावर मोफत बियाणे मिळणार आहेतत्यासाठी शेतक-यांनी महाडीबीटी वर अर्ज करावेअसे कृषी विभागाने कळविले आहे.

पात्र लाभार्थी : शेतकरी गटशेतकरी उत्पादक कंपनीकृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इसंस्था यांची (31मार्च 2024 पूर्वीआत्मामहाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानमहिला आर्थिक विकास महामंडळनाबार्ड इः संस्था

पीक प्रात्यक्षिकाची अंमलबजावणी करताना शेतकरी निवड सर्वसाधारण 75 टक्के,अनुसूचित जाती 17 टक्के व अनुसूचित जमाती 8 टक्के या प्रमाणे करण्यात येईल. (लाभाध्यांपैकी 30 टक्के महिला लाभार्थी निवडले जातीलएका कुटुंबातील (पतीपत्नी व 18 वर्षाखालील अपत्य) एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.  प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने 25 शेतकऱ्यांची निवड करावीपिक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटभ्‍ पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट कंपनी संस्था निवड प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येईल.

गटामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यास तयार असतील अशाच शेतकऱ्यांची निवड लाभार्थी म्हणून करावीलाभार्थी गटाची निवड ही महाडीबीटी पोर्टलद्वारे होणार असल्याने कृषी विभागाकडील विहित नमुन्यातील हमीपत्र देण्यास तयार असावेप्रात्यक्षिकाच्या लाभार्थीसाठी मृदा आरोग्य कार्ड मृदा चाचणी/केलेली असावी.

अर्ज प्रक्रिया : शेतकरी बांधवांनी 26 ते 29 मे 2025 या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत.

निवडीचे निकष : या योजनेसाठी "प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्यया तत्त्वावर शेतकऱ्यांची निवड केली जाईलत्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेतनिवड झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या 29 मे 2025 रोजी सायंकाळपर्यंत महाडीबीटी पोर्टलबर उपलब्ध होतीलतसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वैयक्तिक संदेश (SMS) देखील प्राप्त होतील. 

बियाणे उचलण्याची मुदत निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संदेश मिळाल्यानंतर 5 दिवसांच्या आत संबंधित तालुकास्तरीय अधिकृत डीलरकडून बियाण्याची उचल करणे आवश्यक आहेमुदतीत बियाणे उचल न झाल्याससदर लाभ रद्द होऊन नवीन लाभार्थ्यांची निवड केल्या जाईल.

          शेतकरी बांधवांनी नमूद केलेल्या मुदतीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहेअधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००००