Search This Blog

Sunday, 25 May 2025

निसर्ग संवर्धन आणि निरोगी जीवनाच्या संदेशाबाबत स्केटर्सने केली जनजागृती


 निसर्ग संवर्धन आणि निरोगी जीवनाच्या संदेशाबाबत स्केटर्सने केली जनजागृती

चंद्रपूरदि. 25 मे: व्याघ्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरातील  शंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नुकतेच 'नेचर स्केटिंग सफारीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी 10 स्केटिंग खेळाडूंनी दुर्गापूर - पद्मापूर  – आगरझरी ते मोहरली या ताडोबा अभयारण्याच्या क्षेत्रातील  एकूण १० किलोमीटरचा निसर्गरम्य आणि जंगल रस्ता स्केटिंग करत पार केला.

या स्केटिंग सफारीचा मुख्य उद्देश निसर्ग संवर्धनव्यायामखेळ व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणे आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करणे हा होता. सफारीमध्ये सहभागी स्केटर्सनी साहसी व खेळाडू वृत्तीने परिसरात सामाजिक प्रबोधन केले. या साहसी सफारी उपक्रमात यज्ञेश प्रवीण भोंगळे (10)देवांशी गोजे (9)अंश मल्लेलवार (6)कृष्णा कलोडे (15)अनिश निखाडे (13)पार्थ रामटेके (9)युवराज चौधरीअक्षित करडभुजे (12)माहांश राखुंडे (6). या बालखेळाडू स्केटर्सनी सहभाग घेतला. 

या सफारीचे मार्गदर्शन राष्ट्रीय स्तरावरील नामवंत स्केटिंग प्रशिक्षक तथा तांत्रिक अधिकारी विनोद निखाडे व राष्ट्रीय रोलर हॉकी खेळाडू ईशा विनोद निखाडे यांनी केले.खेलो इंडिया या संकल्पनेतून खेळाडूंची साहसी वृत्ती प्रदर्शित करणारा हा उपक्रम निसर्ग संवर्धनासाठी समाजाला प्रेरणा देणारा ठरला.

00000000

No comments:

Post a Comment