Search This Blog

Monday, 5 May 2025

वेव्हजच्या पार्श्वभुमीवर ‘ध्वनी चित्र रंजन’ कार्यक्रामाचे आयोजन

 


वेव्हजच्या पार्श्वभुमीवर ध्वनी चित्र रंजनकार्यक्रामाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 5 मे : मुंबई येथे जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) 2025 या उपक्रमाच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ध्वनी चित्र रंजनया विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपुरातील सावित्रीबाई फुले सभागृह, येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मागदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे यांनी केले.

सदर कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा, मनोरंजन व जाहिरात क्षेत्रातील महाराष्ट्राचे योगदान, महाराष्ट्र गीतांची मेडली, स्थानिक वाद्यांची जुगलबंदी, नाट्यगीते, चित्रपट गीत आणि लोकधारा अशा बहुरंगी सादरीकरणांनी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ता हरीश सहारे, तेजराज चिकटवार, शैलेश पाटील व प्रदीप यमनूरवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment