Search This Blog

Thursday, 1 May 2025

चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री डॉ. अशोक उईके







 

चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री डॉअशोक उईके

Ø महाराष्ट्र दिनानिमित्त्‍ ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 

चंद्रपूरदि. 1 मे : संपूर्ण देशात महाराष्ट्र हे आर्थिक संपन्न आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जातेत्याप्रमाणेच नैसर्गिक वनाच्छादन असलेला चंद्रपूर जिल्हा हा जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पविविध उद्योगउर्जानिर्मिती प्रकल्पसैन्याकरीता लागणारी आयुधी निर्माणी आदीमुळे जागतिक पटलावर ओळखला जातोजिल्ह्याची ही ओळख कायम राहावीविकासाच्या मार्गावर जिल्हा अग्रेसर राहावायासाठी शासन आणि प्रशासन सैदव प्रयत्नशील राहीलअशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मुख्यालय येथे ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होतेयावेळी खासदार प्रतिभा धानोरकरआमदार सुधाकर अडबालेआमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंगपोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनआयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना सर्वप्रथम वंदन करून पालकमंत्री डॉउईके म्हणालेस्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहेस्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेने वेग घेतलायाच अनुषंगाने 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालीयासाठी मोठा लढा उभा करावा लागलाहुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्र राज्याने सुरवातीपासूनच सामाजिकआर्थिकशैक्षणिकसांस्कृतिकऔद्योगिक व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भरभक्कम सरकार सत्तेत आले आहेशेतकरीशेतमजूरआदिवासीदलितवंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत आहेतसेच पहिल्या 100 दिवसात सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावीया दृष्टीने देखील पाऊले टाकली आहेतवैशिष्ट म्हणजे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सात कलमी कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सर्वांसाठी घरे अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदमार्फत एकाच वेळी जवळपास 35 हजाराच्यावर लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भुमिपूजन करण्यात आले आहेऔद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन अंतर्गत जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या औद्योगिक परिषदेत 12 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून 17 हजार 431 कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्यात आली आहेयातून 14 हजार थेट रोजगार निर्मिती होणार आहेअसे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी सांगितले

उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगतीअभियान अंतर्गत चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटीलउपायुक्त मंगेश खवलेसंदीप छिद्रावारविजय बोरीकररविंद्र हजारेशुभांगी सुर्यवंशीअनिलकुमार घुलेअमुल भुतेयुधिष्ठिर रैच यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलातसेच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे चांदा पब्लिक स्कुलमाउंट कार्मेल कॉन्व्हेंटआनंद निकेतन महाविद्यालयवरोरा यांचाआदर्श ग्राम महसूल अधिकारी प्रविण ठोंबरे यांना तसेच पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ या ब्रीदवाक्य स्पर्धेतील हिमाशू संजय वडस्करसमृध्दी गुप्ताचांदणी बलराम झा यांचाही पालकमंत्री डॉअशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

००००००

No comments:

Post a Comment