Search This Blog

Friday, 23 May 2025

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी


 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

चंद्रपूर,दि. 23 मे :  भारतीय सैन्यदल नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 16 जून ते 29 ऑगष्ट 2025 या कालावधीत कोर्स आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवासभोजनआणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयनविन प्रशासकीय ईमारतपहिला माळाचंद्रपूर (दूरध्वनी क्रमांक 07172-257698) येथे दिनांक 11 जून 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६५) कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

सदर कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे. (अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. (ब) उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली याचे मार्फत घेण्यात येणाऱ्या (CDS) परीक्षेकरीता आनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आय डी : training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253- 2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306  (प्रवेशपत्र मिळण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment