Search This Blog

Tuesday, 20 May 2025

‘रक्तदाब अचूक मोजा…नियंत्रित ठेवा…दीर्घायुष्य जगा’


 रक्तदाब अचूक मोजानियंत्रित ठेवादीर्घायुष्य जगा

Ø जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक उच्च रक्तदाब दिन

चंद्रपूरदि. 20 मे : जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आलाकार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेतर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉहेमचंद कन्नाकेडॉनिखील भागवत उपस्थित होते.

यावेळी डॉचिंचोळे म्हणालेउच्च रक्तदाब हा सर्वांसाठी हानीकारक आजार आहेजास्त मीठचरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न सेवन केल्याने तसेच मद्यपानधुम्रपान तंबाखुयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतोत्यामुळे ब्रेन स्ट्रोकहार्ट अटॅककिडनीचे आजारपक्षाघात (लकवाआणि डोळयाचे आजार होऊन अंधत्व येऊ शकते व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉपद्मजा बोरकर यांनी केलेसंचालन समुपदेशक रामेश्वर बारसागडे यांनी तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉअभय राठोड यांनी मानलेकार्यक्रमाला जिल्हा तंबाखु नियंत्रण सल्लागार डॉस्वेता सावलीकरअधिपरिचारीका माया आत्रामपाठ्यनिर्देशिका प्रज्ञा अंबादे व रिना कन्नाकेसुविधा काकडेस्टॉफ नर्स प्राची काहिलकर तसेच रुग्णालयातील अधिकारीकर्मचारीनर्सिंग विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

उच्च रक्तदाबाची लक्षणे : डोकेदुखीसतत किंवा तीव्र वेदनाछातीत दुखणेश्वास लागणे किंवा हदयाची धडधड होणेचेहरा लाल होणे किंवा डोळे चमकणेघाबरटपणा होणे इत्यादी आहेतवरील प्रमाणे लक्षणे दिसून आल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालय किंवा खाजगी रग्णालयात तपासणी करून निदान करावे.

अशी घ्या काळजी : उच्च रक्तदाबाचे डॉक्टरांकडुन निदान झाल्यास डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नियमीतपणे औषधोपचार घेणेतसेच आजारापासून दूर राहण्याकरिता नियमितपणे व्यायामजीवनशैलीत बदल करणेतसेच ताणतणाव दूर करण्याकरिता दिनचर्यामध्ये गाणे ऐकणेपेपर वाचणेपोहणेपायी चालणेइत्यादी चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.

2025 ची थीम : या वर्षाची थीम तुमचा रक्तदाब अचुक मोजात्याला नियंत्रित ठेवादीर्घायुष्य जगा’ अशी आहेउच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आहेजोपर्यंत आपण तपासणी करत नाहीतोपर्यंत स्वतःला माहित पडत नाहीकरिता 30 वर्षावरील सर्व व्यक्तिनी/नागरीकांनी आपल्या नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन रक्तदाब तपासणी करून घ्यावी.

No comments:

Post a Comment