Search This Blog

Thursday, 1 May 2025

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन




 पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन                                                        

चंद्रपूरदि. 1 मे : प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके यांच्या हस्ते आज (दि.1) उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकरआमदार किशोर जोरगेवारआमदार सुधाकर अडबालेजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह कक्ष प्रमुख कथा वैद्यकीय अधिकारी डॉकविश्वरी कुंभलकरसमाजसेवा अधीक्षक भास्कर शेळकेवरिष्ठ लिपिक दीपक शेळके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉउईके म्हणालेराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आले आहेजिल्ह्यातील सर्व रुग्णांना या कक्षाची माहिती झाली पाहिजेगरीब रुग्णांना मुंबईला यासाठी चकरा मारा लागू नये म्हणूनस्थानिक पातळीवरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहेप्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर हा कक्ष उभारण्यात आला असून जनतेमध्ये याची जास्तीत जास्त जनजागृती करावीअसे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश : समाजातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणेनिर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय अंतर्गत उपचार मिळवून देणेमहात्मा ज्योतिबा फुले /आयुष्यमान भारत योजना तसेच इतर जनआरोग्य योजनांची माहिती रुग्णांना देणे व त्यांना संदर्भित करणेआरोग्य संबंधित योजनेमध्ये समाविष्ट होऊ न शकणा-या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत करणे.

००००००

No comments:

Post a Comment