Search This Blog

Thursday, 8 May 2025

बेवारस मोटारसायकलचा होणार लिलाव

 

बेवारस मोटारसायकलचा होणार लिलाव

          चंद्रपूरदि. 8 मे माजरी येथील पोलिस स्टेशनमध्ये बरेच वर्षापासून बेवारस स्थितीत 40 मोटारसायकल जमा करण्यात आल्या आहेतसदर वाहनाबाबत कोणताही इसम आजपावेतो पोलिस स्टेशनला वाहनाच्या मालकी हक्काबाबत मुळ कागदपत्र घेऊन हजर झाला नाही व मालकी हक्काबाबत मुळ कागदपत्र सादर केले नाही. 

          तरी सदर वाहन ज्या कोणाच्या मालकी हक्काचे असतील, त्यांनी पोलिस निरीक्षक, पोलीस स्टेशन माजरी यांच्या कार्यालयात सक्षम पुराव्यासह या उदघोषणापत्राच्या प्रसिध्दीपासुन 60 दिवसांच्या आत दावा दाखल करावाविहीत कालावधीनंतर कोणाचाही दावा/हक्क/तक्रार दाखल करून घेतली जाणार नाहीयाची नोंद घ्यावीअसे पोलिस निरीक्षकमाजरी पोलिस स्टेशन यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment