Search This Blog

Tuesday, 6 May 2025

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी' योजना

 अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी' योजना

चंद्रपूर. दि, 6 मे : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया' योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. चंद्रपुर जिल्ह्यातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment