Search This Blog

Saturday, 10 May 2025

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 626 प्रकरणे यशस्वी निकाली

 

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 626 प्रकरणे यशस्वी निकाली

चंद्रपूरदि. 10 मे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मे 2025 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर लोक अदालतीमध्ये एकूण 8,466 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि 9,989 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 495 प्रकरणेतर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 131 प्रकरणेअसे एकूण 626 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.

या अदालतीदरम्यान भूसंपादनाचे 1 प्रकरण निकाली काढण्यात आले असूनत्यामध्ये 4 लाख 95 हजार रुपये  नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. धनादेश (चेक) प्रकरणांपैकी 73 प्रकरणेतसेच कामगार व औद्योगिक न्यायालयातील एकूण 22 प्रकरणे देखील निकाली काढण्यात आली.

या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यशस्वी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीशवकीलन्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभलेअशी माहिती  सुमित  जोशीसचिवजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपूर यांनी दिली आहे.

0000000

No comments:

Post a Comment