Search This Blog

Wednesday, 14 May 2025

धान /भरडधान्य खरेदी नोंदणीकरीता 31 मे पर्यंत मुदतवाढ


 

धान /भरडधान्य खरेदी नोंदणीकरीता 31 मे पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 14 मे : रब्बी पणन हंगाम 2024-25 मधील शासकीय आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत धान भरडधान्य खरेदी करीता शेतकरी नोंदणीला 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहेमागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात शेतकरी नोंदणी झाल्यामुळे तसेच शेतकरी नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नयेम्हणून शेतकरी नोंदणी करीता सदर मुदत वाढ देण्यात आली आहे.

तरी धान/ भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्हीएसतिवाडे यांनी केले आहे.

असे आहेत खरेदी केंद्र : 1)  विविध कार्यकारी सहकारी संस्था राजोली (तामूल), 2) मुल कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, 3) चंद्रपुर जिल्हा कृषी औद्योसहकारी संस्था चिमुर, 4) चिमूर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री नेरी (ताचिमूर), 5) सेवा सहकारी संस्था मर्याअंतरगाव (तासावली), 6) चंद्रपुर कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपुर, 7) तालुका शेतकी खरेदी विक्री सहसंस्था सिंदेवाही, 8) नवरगाव सहकारी राईस मिल नवरगाव, (तासिंदेवाही), 9) सिंदेवाही सहकारी भात गिरणी सिंदेवाही, 10) कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही, 11) सेवा सहकारी संस्था रत्नापुर (तासिंदेवाही), 12) तालुका शेतकी खरेदी विक्री सहसंस्था नागभीड, 13) श्रीगुरुदेव सहकारी राईस मिल कोर्धा, (तानागभीड), 14) कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड, 15) चंद्रपुर जिल्हा कृषी औद्योगिक सहसंस्था ब्रम्हपुरी, 16) चंद्रपुर जिल्हा कृषी औद्योगिकसहकारी संस्था बरडकिन्ही (ताब्रम्हपुरी), 17)  ब्रम्हपुरी खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था ब्रम्हपुरी, 18) कान्हा धान्य उत्पादक कृषक सहकारी संस्था मर्यामाहेर (ब्रम्हपुरीआणि 19) कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा.

०००००००

No comments:

Post a Comment