Search This Blog

Thursday, 8 May 2025

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


 

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Ø आयटीआयमध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

मुंबई / चंद्रपूर, दि. 8 मे जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहेपार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेतकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज  या शिबिराचे उद्घाटन करण्यात आलेराज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत.  

          या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीआपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहेआपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असोयाचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावायाचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजेमानवाने प्रगती केली असली तरीआपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे श्रीलोढा म्हणालेत्याचबरोबर या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयटी आयमध्ये  सहा नव्या अभ्यासक्रमाची यावेळी घोषणा केलीयात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई व्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापनइंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंगड्रोन तंत्रज्ञान,  सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.

        दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीसुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन लाभलेतर राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्रीप्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली.

          राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉलीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय हे विद्यार्थ्यांना  सांगितलेया दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहेमानव निर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजीउपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलीतसेच मंत्री श्रीमंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थिनींनी सादर केलीराजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमतीएसएसमाने यांनी यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

००००००

No comments:

Post a Comment