Search This Blog

Thursday, 8 May 2025

विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करा


 विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करा

Ø पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

चंद्रपूर,दि. 8 मे ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतातया योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याकरिता जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहेयामध्ये एखादया योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पूढील वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय शासनाने केली आहेयामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकते तसेच लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

त्याकरिता सन 2025-26 या चालू वर्षात वैयक्तिक योजनांचा लाभ घेण्याकरिता मे 2025 पासून  ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : http://ah.mahabms.com अँड्राईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव AH-MAHABMS(Google play Store वरिल मोवाईल अॅपवर उपलब्ध). टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 18002330418.

अशा आहेत योजना : पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सन 2025-26 या वर्षात विविध वैयक्तिक लाभाच्या योजना जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 100 कुक्कुट पिल्लांचे गट वाटपविशेष घटक योजनांतर्गत 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट पुरवठा तसेच 75 टक्के अनुदानावर (10 शेळया व 1 बोकडशेळी गट पुरवठाआदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरिल आदिवासी योजना (TSP & OTSP) अंतर्गत 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट पुरवठा तसेच 75  टक्के अनुदानावर (10 शेळया व 1 बोकडशेळी गट पुरवठा यासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रकिया राबविली जाणार आहेअर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेअंतर्गत कार्यवाही सुरु असतांना आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शविलेलया टोल फ्री क्रमांकावर किंवा पंचायत समिती स्तरावर तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि.) किंवा कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकिय दवाखान्यातील अधिकारी किंवा कर्मचारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीजिल्हा परिषदचंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावातसेच जास्तीत जास्त प्रमाणात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉउमेश हिरुडकर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment