Search This Blog

Wednesday, 25 March 2026

डॉ. आंबेडकर कॉलेज येथे जिल्हा उद्योजक मेळावा संपन्न

 

डॉआंबेडकर कॉलेज येथे जिल्हा उद्योजक मेळावा संपन्न

चंद्रपूरदि. 25 :  जिल्हा  कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉआंबेडकर कॉलेज ऑफ सायन्सकॉमर्स अन्ड आर्टस आणि वे आसरा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉआंबेडकर कॉलेज येथे उद्योजक मेळावा तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारे तर प्रमुख अतिथी म्हणून दे – आसरा फाऊंडेशनचे व्यावसायिक समुपदेशक योगिता कस्तुरेबिझेनेस ग्रोथ स्ट्रॅटजिस्ट डॉरविंद्र अहेरसहायक आयुक्त कौशल्य विकास अनिसा तडवी आदी उपस्थित होते.

योगिता कस्तूरे यांनी सदर संस्थेच्या कामकाजासंबंधी माहिती दिलीतसेच मार्गदर्शक डॉरविंद्र अहेर यांनी सुक्ष्मलघुउद्योग व पारंपरिक कारागिरांना त्यांच्या व्यवसायाच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ठता प्राप्त करता यावी, त्यांच्या क्षेत्रातील इतर उद्योजकासमवेत ओळख व्हावी, तसेच व्यवसाय वाढविण्यासाठी मार्गदर्शन केलेअमर नायसे यांनी, उद्योग करताना अनेक प्रकारचे तणाव निर्माण होतात. त्या तणावावर नियंत्रण कसे करायचे यासंबंधी मार्गदर्शन केले.

अनिसा तडवी यांनी प्रास्ताविकत उद्योजक मेळावा हा आपल्याला आलेली संधी असून उद्योग सुरू कसा करायचायाविषयी मार्गदर्शन केलेतसेच जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केलेसदर कार्यक्रमात 200 उमेदवार उपस्थित होते.

००००००

सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे 10 दिवस जाहीर


 सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे 10 दिवस जाहीर

चंद्रपूरदि. 25 :  केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 च्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रणसुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत श्रोतगृहेसभागृहसामुहिक सभागृह आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५ सवलतीचे दिवस निश्चित करून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीताजिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आल आहे.

त्यानुसार जिल्हादंडाधिकारीचंद्रपुर यांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा  राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यासाठी सन 2026 करीता सवलतीचे 10 दिवस जाहीर केले आहे.

शिवजयंती -  एक दिवस (19 फेब्र. 2026), डॉबाबासाहेब आंबेडकर जयंती एक दिवस  (14 एप्रिल 2026),  ईद--मिलाद – एक दिवस (26 ऑग. 2026) तथा (तिथीनुसार चंद्रकलेनुसार), गणेश उत्सव तीन  दिवस (अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर 2026 व  इतर दोन दिवस), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमी दि. 18 ऑक्टोबर व नवमी दि. 19 ऑक्टोबर 2026), धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन -  एक दिवस (16 ऑक्टो. 2026),       31 डिसेंबर – एक दिवसआणि राखीव  दिवस - पाच दिवस.

गणेश उत्सवाचे दरम्यान दोन राखीव दिवस ठेवण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित  करण्यात येतीलअसे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

3 ते 5 एप्रिल या कालावधीत ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रम

 ते एप्रिल या कालावधीत अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रम

चंद्रपूरदि. 25 :  खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहेस्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम ते 5 एप्रिल या कालावधीत कन्यका परमेश्वरी हॉलचंद्रपूर येथे  राबविण्यात येणार आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहेया विशेष बाजारपेठेत नागरिकांना विविध प्रकारची आकर्षक उत्पादने खरेदी करता येणार आहेतस्वादिष्ट खाद्यपदार्थट्रेंडी व पारंपरिक कपडेघरगुती उपयोगाच्या वस्तुकलात्मक हस्तकलादागदागिनेतसेच अनेक स्वदेशी उत्पादनांचा समावेश या प्रदर्शनात असेल.

'लोकल टू व्होकलसंकल्पनेला बळ देणेस्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना विश्वासार्हगुणवत्तापूर्ण स्थानिक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहेनागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावाअसे आवाहन अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रममोहन पांडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी श्रीरंग खोंड (7057909073) वैष्णवी दारव्हेकर (9689473020) या क्रमांकावर संपर्क करावाअसे कळविण्यात आले आहे.

००००००

Tuesday, 24 March 2026

पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व कंपन्यांकडून उपाययोजना


 पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व कंपन्यांकडून उपाययोजना

Ø अफवांवर विश्वास ठेवू नकाजिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर दि. 24 : चंद्रपूर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल /डिझेल संपल्याबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व गोंधळ निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहेयाबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे कीचंद्रपूर शहरातील तसेच जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची पेट्रोल /डिझेलची टंचाई निर्माण झालेली नाहीपेट्रोल /डिझेल इंधनपुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत आहे व यावर संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.

नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन : 1) कोणत्याही अफवासोशल मिडीयावरील चुकीचा संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. 2) नाहक भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात पेट्रोल /डिझेल खरेदी करू नये. 3) पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी व वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्था विषयक परिस्थिती निर्माण होणार नाहीयाची दक्षता घ्यावी. 4) इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेयावर विश्वास ठेवावा. 5) अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणेहा कायद्याने दंडनीय अपराध असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. 6) कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.

नागरिकांनी शांतता संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

०००००

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई / चंद्रपूर दि. 24 : महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असूनसार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली  खारघरनवी मुंबई येथील सिडकोच्या जागेवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र उभे राहिले आहेया केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेश्री सत्य साई संजीवनी केंद्रामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसकेअंतर्गत टू-डी-इको शिबिरांचे आयोजन करण्यात आलेया शिबिरांद्वारे विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयरोग तज्ञांकडून एकूण 2507 टू-डी-इको तपासण्या करण्यात आल्यातसेच जन्मजात हृदयरोग (सीएचडीउपचारासाठी राज्यभरातील आरबीएसके पथकांमार्फत 3226 बालकांवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र येथे उपचार करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार श्री सत्य साई संजीवनी केंद्रांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि सातारा जिल्ह्यातील जावळी या आदिवासी बहुल तालुक्यांना दत्तक घेऊन तेथे विशेष आरोग्य उपक्रम राबविलेतसेच पुण्यातील शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात आल्यारायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आरोग्य सेवा पोहचविण्यात येत आहेतविदर्भातील चंद्रपूरयवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये बालकांमधील जन्मजात हृदयरोग तपासणी साठी मेगा शिबिरे सुरू असूनदुर्गम भागातील बालकांनाही अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत.

नवी मुंबई येथे बांधकाम कामगार तसेच वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी विशेष आरोग्य प्रकल्प राबविण्यात येत आहेततसेच अंगणवाडी सेविकांसाठी नॉन-कम्युनिकेबल डिसीज (एनसीडीआणि कर्करोग तपासणी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहेयाशिवायआजपर्यंत आशाअंगणवाडी सेविकासहाय्यक परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी अशा 3500 हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना क्षमता विकास प्रशिक्षण देण्यात आले आहेहे सर्व उपक्रम राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षमसर्वसमावेशक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

००००००००