Search This Blog

Monday, 31 August 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2547

 


चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2547

24 तासात आणखी 203 कोरोना बाधितांची नोंद

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 1269

1249 बाधित कोरोनातून बरे

चंद्रपूरदि 31 ऑगस्ट: जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 203 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 547 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 1 हजार 269 असून आतापर्यंत 1 हजार 249 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येबाबुपेठ चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 22 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

45 वर्षीय ऊर्जानगर चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार होता. 30 ऑगस्टलाच सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

तर तिसरा मृत्यु हा 65 वर्षीय गांधी वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 29 ऑगस्टला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 30 ऑगस्टला बाधिताचा अहवाल पॉझिटीव्ह आला उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 26तेलंगाणाबुलडाणा व गडचिरोली येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 122, राजुरा तालुक्यातील 13 , वरोरा तालुक्यातील 9, बल्लारपूर तालुक्यातील 9 , भद्रावती तालुक्यातील 3 , गोंडपिपरी तालुक्यातील 23, पोंभूर्णा तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील 5,  सावली तालुक्यातील 2,  मूल तालुक्यातील 12,  नागभीड तालुक्यातील 4 बाधित असे एकूण 203 बाधित पुढे आले आहे.

चंद्रपूर शहरातील रेस्ट हाऊस परिसरपटवारी भवन वार्ड नं. 5, बिनबा वार्डऊर्जानगररामनगर कॉलनी परीसरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरपठाणपुरा वार्डजिल्हा कारागृहदुर्गापुर सिद्धार्थ नगर वार्ड नं. 4, किरमे प्लॉट बाबुपेठचेतन गॅस एजन्सी जवळ रामनगरआकाशवाणी रोड परिसरसाईबाबा वार्ड सिव्हिल लाईनदुर्गापुर वार्ड नं.1, देना बँक परिसर बाजार वार्डबालाजी वार्ड गोपालपुरीमहाराष्ट्र बँक परिसर तुकूमहनुमान मंदिर परिसर दादमहल वार्डभानापेठ वार्ड विजय टॉकीज परिसरदिनकर नगर लालगुडाकन्नमवार वार्ड अंचलेश्वर गेट परिसरविठ्ठल मंदिर वार्डबाजार वार्ड चौधरी पॅलेस परिसर,  भिवापूर वार्ड ओम नगरप्लॉट नं.1 सोईतकर हाऊस परिसरकृषी उत्पन्न बाजार समिती परिसरखत्री कॉलेज परिसरजीवन साफल्य कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील चूनाभट्टी वार्डएरिया हॉस्पिटल सास्तीदेशपांडे वाडीविरुर स्टेशन वॉर्ड नं. 4 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.वरोरा तालुक्यातील कासमपंजा वॉर्डविनायक लेआउटबोर्डानागरीशेगावभागातून बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर येथील शांती नगर वार्डकिल्ला वार्डराणी लक्ष्मी वार्डमौलाना आजाद वार्डकन्नमवार वार्डदादाभाई नौरोजी वार्डबामणी परिसरातून बाधीत ठरले आहे.

भद्रावती येथील खापरी वार्डलुंबिनी नगर विजासन रोड परिसरकोकेवाडा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील वाढोलीलिखितवाडापरिसरातून बाधीत पुढे आले आहे.कोरपणा येथील वनसडीनोकारी पालगाव भागातून बाधीत ठरले आहे. मूल तालुक्यातील वार्ड नं. 15, वार्ड नं. 11, वार्ड नं.14, केळझरचिरोलीगोवर्धनभागातून बाधित पुढे आले आहे.

000000

Sunday, 30 August 2020

चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 31 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 31 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



पूरग्रस्त भागात बचाव पथकाद्वारे मदत कार्य सुरू





 पूरग्रस्त भागात बचाव पथकाद्वारे मदत कार्य सुरू

एनडीआरएफ पथक सोमवारला दाखल होणार

ब्रह्मपुरी परिसरातील पूर परिस्थितीची

ना. वडेट्टीवार यांनी केली पहाणी

चंद्रपूरदि.30 ऑगस्ट: गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीची पातळी सतत वाढत असून ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलजअहेरगावचिखलगाव आदी लगतच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी दाखल करण्यात येत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. पुरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेऊन त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पुर परिस्थितीची पहाणी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्याचे कार्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकाद्वारे सुरू आहे. पुर परिस्थितीवर नियंत्रणासाठी एनडीआरएफचे पथक सोमवारी दाखल होणार आहे.

गोसीखुर्द धरणात पाण्याचा साठा वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी वैनगंगा नदीला पूर आला आहे. पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलजअहेरगावचिखलगाव आदी लगतची गावे पाण्याखाली गेली आहेत. लाडज गावातून 72 तर बेलगांव येथून जवळपास 250 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य बोटीद्वारे बचाव पथक सतत करीत आहे.

बचाव कार्य करण्यासाठी पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी हेलिकॉप्टर मागविले होते. उद्या देखील हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्यात येणार आहे.

सावली तालुक्यातील बेलगाव, निमगाव आदी गावांत पुराचा फटका बसला आहे. तसेच पोंभूर्णागोंडपिंपरी तालुक्यातील वैनगंगा नदी परिसरात असणारे गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

00000

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1224 कोरोना मुक्त


 

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1224 कोरोना मुक्त

जिल्हा कारागृहात आढळले 72 बाधित

24 तासात 270 बाधित आले पुढे; एका बाधिताचा मृत्यू

Ø  जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 2344

Ø  उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 1094

चंद्रपूरदि. 30 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात 270 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 2 हजार 344 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 224 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 1 हजार 94 आहे.

50 वर्षावरील नागरिकांची घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी सुरू आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करावे. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावादैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. हॅन्ड सॅनिटायजरचा वापर करावा तसेच तापसर्दीखोकला सारखे लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाला माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार  जिल्ह्यात 24 तासात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. नवेगांव ता.मुल येथील 76 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 21 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. कोरोनासह न्युमोनिया तसेच श्वसनाचा आजार असल्याने 29 ऑगस्टला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 26 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 23, तेलंगाणाबुलडाणा व गडचिरोली येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये जिल्हा कारागृहातील  एक अधिकारी व 71 कैदी बाधित ठरले असून चंद्रपूर शहर व परिसरातील 166 बाधितांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुल 9, चिमूर 1 , नागभीड 21, राजुरा 8, वरोरा 13, भद्रावती 2, सावली 5, ब्रह्मपुरी 24, बल्लारपूर 5, कोरपना 14, गोंडपिपरी 2 बाधित पुढे आले अाहेत. असे एकूण 270 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.

चंद्रपूर शहरातील जिल्हा कारागृहातील सर्वाधिक पॉझिटिव्ह ठरले असून साई बाबा वार्डतुकुमनगीना बागबंगाली कॅम्पभानापेठसमाधी वार्डसिस्टर कॉलनीपठाणपुराजुने तलाठी कार्यालय परिसरसंत रवीदास चौकजटपुरा गेट परिसरकोतवाली वार्डसिव्हिल लाईन,  जीएमसी परिसरअंचलेश्वर वार्डविठ्ठल मंदिर वार्ड,  घुटकाळा वार्डरयतवारी तसेच तालुक्यातील दुर्गापुरपडोलीऊर्जानगर भागातून बाधित पुढे आले आहेत.

मूल येथील पंचशील चौक तर  तालुक्यातील फिस्कुटीचिंचाळा तालुक्यातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. नागभीड तालुक्यातील तळोदी बाळापुर येथील बाधित ठरले आहेत. राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसरइंदिरानगरचुनाभट्टी परिसरातून बाधित आढळून आले आहे.

वरोरा येथील अभ्यंकर वार्ड येथील बाधित ठरले आहेत. भद्रावती तालुक्यातील पाटाळागौराळा भागातून बाधित पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बु परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

ब्रह्मपुरी येथील संत रवीदास चौकगुजरी वार्ड,हनुमान नगर तर तालुक्यातील बोरगाव,  उदापूरचिंचोलीमेंडकीजुगनाळा परिसरातून बाधित पुढे आले आहेत. बल्लारपूर येथील रेल्वे नगर वार्डगोकुळ नगरमहाराणा प्रताप वार्ड भागातून बाधित ठरले आहेत.

कोरपणा तालुक्यातील वनसळीगडचांदूर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील किरिमिरीआर्वी गावातून बाधित ठरले आहेत.

000000

चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 30 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 30 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



Saturday, 29 August 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074


 चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074

1176 कोरोनातून बरे ; 873 वर उपचार सुरू

24 तासात 178 बाधितांची नोंद दोन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर,दि. 29 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 1176 बाधित बरे झाले आहेत . तर सध्या 873 बाधितांवर उपचार सुरू आहे. 24 तासात 178 बाधितांची नोंद झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येनेताजी चौक विजासन रोडभद्रावती येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधित महिलेला 19 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. कोरोनासह न्युमोनिया असल्याने 28 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.

तर दुसऱ्या बाधिताचा आज 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30  वाजता 49 वर्षीय शेडमाके चौक दुर्गापूरचंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. 29 जुलैला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसापासून बाधिताला श्वसनाचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30  वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनियाचा आजार होता.

गेल्या 24 तासांमध्ये पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक 76 बाधित ठरले आहेत. त्याचबरोबरपोंभुर्णा 4कोरपना 5सिंदेवाही 2वरोरा 8ब्रह्मपुरी 4राजुरा 10मुल 16गोंडपिपरी 5, सावली 33भद्रावती 4चिमूर 2, बल्लारपूर 8, नागभिड एक असे एकूण 178 बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर शहरातील नगीना बागपंचशील चौकजटपुरा वार्डजलनगरभानापेठतुकूमरामाळा तलावविठ्ठल मंदिर वार्डबियाणी नगरचांदमारी चौकपठाणपुरा गेटगंज वार्डरामनगरगोपाल पुरी वार्डसरकार नगररयतवारीसिव्हिल लाईनजीएमसी चंद्रपूर परिसरनर्सिंग होस्टेल परिसरगायत्री नगरबालाजी वार्डसन्मित्र नगरकृष्णा नगरअंचलेश्वर वॉर्डबाबुपेठसमाधी वार्ड तर तालुक्यातील घुग्घुसमोहर्ली गेट भागातून बाधित ठरले आहेत.

पोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा गावातून बाधित पुढे आले आहेत. कोरपना तालुक्यातील उपरवाहीगडचांदूरआवारपूर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

सिंदेवाही शहरातील तसेच तालुक्यातील लोनवाही गावातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील गुरु माऊली नगरअभ्यंकर वार्ड तर  तालुक्यातील शेगावअहेगाव गावातून पॉझिटिव पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी येथील गुरुदेव नगर तर तालुक्यातील नानोरीचांदली गावातून बाधीत ठरले आहेत.

राजुरा येथील पेठ वार्डइंदिरानगरसाई मंदिर परिसरातील तर तालुक्यातील लखमापूरविहीरगाव भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील फिस्कुटीचिंचाळाबोरचांदलीराजोली गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वीवढोली भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बुसामदा गावातून बाधित पुढे आले आहेत.भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथून बाधित ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील सोनेगाव व म्हसाळा गावातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

00000

चंद्रपूरातील बचतगटांची उत्पादने आता ॲमेझानवर ना. वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले वेबसाईटवर प्रदर्शित





चंद्रपूरातील बचतगटांची उत्पादने आता ॲमेझानवर

ना. वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले वेबसाईटवर प्रदर्शित

चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : गावपातळीवर आपल्या गुणकौशल्यातून विविध नाविण्यपुर्ण उत्पादने निर्माण करणाऱ्या उमेद स्वयंसहायता समुहांना जागतिक बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने जिल्हयाने आणखी एक महत्वाचे पाउल टाकले आहे. जिल्हातील उमेद समुहांची उत्पादने आता ॲमेझान या ई कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध झाली आहेत. दिनांक 29 ऑगस्ट रोजी नियोजन भवनात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या या उत्पादनांना वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले. 

    राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (उमेद) अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. सदयस्थितीत जिल्हयात सुमारे 7200 समुह आहे. या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर 860 ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे, तर 34 प्रभागसंघ तयार झाले आहेत. अभियानाच्या माध्यमातून सुमारे 1 लाख 80 हजार कुटूंबे आपल्या विविध आर्थिक गरजा भागवत आहेत. जिल्हयात विविध समुह अनेक उत्पादने तयार करीत आहेत. यात कलाकुसरीच्या वस्तू , खादय उत्पादने, काष्ठ शिल्प, वनऔषधी आदीचा समावेश आहे. सध्या या वस्तू जिल्हा व राज्य पातळीवरील प्रदर्शने तसेच स्थानिक स्तरावर विकल्या जात आहेत. आता या उत्पादनांना जागतिक दर्जाच्या ई कॉमर्स वेबसाईट ॲमेझान वर स्थान मिळाले आहे. 

    आज नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या सह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, विसापूर येथील सुरभी, झाशी राणी व जागृती या स्वयंसहायता समुहातील महिलांना ॲमेझान उत्पादनाचे पत्र देण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. वडेट्टीवार यांनी महिलांचे कौतुक करीत सदर वस्तू आता भारतभरातील ग्राहक खरेदी करतील आणि या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास व्यक्ती केला. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनीही यावेळी महिलांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले यांनी लवकरच ॲमेझानवरील उत्पादनांची संख्या वाढून 16 होईल, असे सांगितले. तसेच उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समुहांचे उत्पादने जिल्हा तसेच जिल्हास्तरावरील विक्री केंद्रातून उपलब्ध होतील, असे सांगितले. 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक संदीप घोंगे, तालुका अभियान व्यवस्थापक उमप, सुकेशीनी गणवीर, श्री. माउलीकर, सुहास वाडगुरे यांनी सहकार्य केले.

0000000

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेत सहभागी व्हावे : ना. विजय वडेट्टीवार





 कोरोना संक्रमण रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी

शासकीय यंत्रणेत सहभागी व्हावे : ना. विजय वडेट्टीवार

Ø लंपी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण वाढवा

Ø पालकमंत्र्यांकडून कोरोनासह विविध विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि.29 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या बघता कोरोना संक्रमण रोखण्यासाठी 20 ते 25 खासगी डॉक्टरांना शासकीय रुग्णालयाची जोडून घ्यावे, तसेच जिल्ह्यात गुरांवर आलेल्या लंपी आजाराच्या नियंत्रणासाठी यंत्रणा बळकट करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री  तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडलेल्या बैठकीत कोरोनासह विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात बाधितांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी  20 ते  25 डॉक्टरांची आवश्यकता असून खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या कार्यात जोडून घेण्याच्या तसेच त्यासंबंधी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्यात.  

          यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एन. मोरे, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र खामगावकर,  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता  सुषमा साखरवाडे आदींसह अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहेत. यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याच्या सूचना तसेच मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यासाठी पर्यायी व्यवस्था, ऑक्सिजन जनरेशन प्लांट लावण्यासंदर्भातील सूचना देखील यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.

जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केलेल्या असून 50 वर्षावरील नागरिकांचे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे कार्य जिल्ह्यात सुरू केले आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांची देखील तपासणी जिल्ह्यात सुरू आहे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यासोबतच जिल्हा आरोग्य विभागामार्फत संक्षिप्त माहिती देणारी होम आयसोलेशन म्हणजेच गृह विलगीकरण ही माहिती पुस्तीका तयार करण्यात आले असून त्यांचे लोकार्पण मा. पालकमंत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले. ही पुस्तीका सर्वसामान्य नागरिकासाठी अती महत्वाची ठरेल.

यासोबतच नगर विकास विभागाअंतर्गत चंद्रपूर तालुका तसेच ब्रह्मपुरी व सिदेंवाही नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी हद्दवाढ ही महत्त्वाची असून त्यासाठी मास्टर प्लान तयार करण्याच्या सूचना नगर विकास विभागाला दिल्या.

         लम्पी हा आजार गाई व म्हशींमध्ये आढळणारा त्वचारोग असून याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रा सह चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिली आहे. गावोगावी शिबिरे आयोजित करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात गोठे फवारणी सुद्धा करण्यात आली आहे, यासोबतच 7 तालुक्यातील 82 हजार 900 गावामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुद्धा  करण्यात आले आहे. मनुष्यबळाअभावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्राकरिता चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही या तालुक्यातील 143 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश केला असून त्याबाबत मास्टर प्लान तयार करण्यासंदर्भात वनविभागाला पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी निर्देश दिलेत.

000000

Friday, 28 August 2020

चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 29 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 29 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी एमएसडब्ल्यूसी मुलमंत्राचा वापर करावा : जिल्हाधिकारी



 कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी एमएसडब्ल्यूसी मुलमंत्राचा वापर करावा : जिल्हाधिकारी

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1117 कोरोनातून बरे

24 तासात 97 बाधितांची नोंद एका बाधिताचा मृत्यू

Ø  बाधितांची संख्या पोहोचली 1896 वर

Ø  उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 756

चंद्रपूर,दि. 28 ऑगस्ट : कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी एमएसडब्ल्यूसी मुलमंत्राचा अर्थात एम म्हणजे मास्कएस म्हणजे सोशल डिस्टन्सिंगडब्ल्यू म्हणजे वॉश युवर हँन्डसी म्हणजे कंट्रोल ऑफ क्राऊड या मुलमंत्राचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. या मुलमंत्राचा अंगीकार केल्यास जिल्ह्यात कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांनी गर्दी होणार नाही असे कुठलेही समारंभ आयोजित करू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये 50 वर्षावरील नागरिकांचे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांची देखील तपासणी जिल्ह्यात सुरू आहे.

31 ऑगस्टपर्यंत 1 हजार 200 आयसोलेटेड बेडची आवश्यकता लागणार आहे. त्यापैकी 900 बेड तयार असून अधिकच्या 450 बेडची सुविधा सैनिक स्कूल येथे केलेली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना बाधितांना दाखल करून घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

सोशल मीडियावर एका बाधितामागे दीड लाख रुपये मिळतात असा संदेश फिरत आहे. या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसून हा संदेश चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. खाजगी रुग्णालयामार्फत एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये 24 तासात आणखी 97 बाधितांची भर पडली आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 896 वर पोहोचली आहे. आतापर्यंत  1 हजार 117 बाधितांना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. तर 756 बाधितांवर उपचार सुरू आहे.

गेल्या 24 तासांमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. 68 वर्षीय कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा आजार असल्याने बाधिताला 27 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. मात्रवैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करून देखील उपचारादरम्यान 27 ऑगस्टलाच सायंकाळी बाधिताचा मृत्यू झाला. या बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया व श्वसनाचा आजार होता. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार,  आतापर्यंत जिल्ह्यात 23 मृत्यू झाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील 20 तर तीन मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर 40, ब्रह्मपुरी 4, भद्रावती 5, राजुरा 7, सावली व चिमूर येथील प्रत्येकी एकगोंडपिपरी 3, मुल 9, बल्लारपूर 12, पोंभुर्णा 2, कोरपना 7, वरोरा 3, उत्तर प्रदेश येथून आलेला एक तर वणी यवतमाळ येथील दोन बाधिताचा समावेश असून  एकूण 97 बाधित पुढे आले आहेत.

000000

डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे आयोजन

 

डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 ऑगस्ट : महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र चंद्रपूर द्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक/युवतींकरीता दि. 1 सप्टेंबर रोजी एक दिवसीय कालावधीचे ऑनलाईन डिजीटल मार्केटिंगची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेत ऑनलाईन बिझनेस संधी आयडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी, गुगल अॅडव्हर्ड, गूगल

अॅनालिटिक्स, सोशल मिडीया मार्केटिंग, युटुब, घरी बसून पैसे कमविण्याची संधी उद्योग उभारणी प्रक्रीया, इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक/युवतींनी त्वरीत दि. 31 ऑगस्ट

पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे,  मो. नं. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा.

000000

 

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारणी कार्यशाळा

 

चंद्रपूर दि. 28 ऑगस्ट :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र चंद्रपूर द्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक / युवतींकरीता दि. 5 सप्टेंबर रोजी 1 दिवसीय कालावधीचे ऑनलाईन सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग उभारणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये व्यवसाय उद्योजकांशी चर्चा लघु उद्योग, व्यवसाय शासकीय व्याख्या व नोंदणी पद्धती, आयात निर्यात उद्योग संधी, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, डिजिटल मार्केटिंग, लघुउद्योगांसाठी व व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व अनुदान, सिडबी तर्फे योजना व अनुदान, लघुउद्योग प्रोडक्ट मार्केटिंग इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्ववारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक युवतींनी त्वरीत दि. 04 सप्टेंबर पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे, मो. नं. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा.

0000000

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

 

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

चंद्रपूरदि. 28 ऑगस्ट: वाळू,रेती निर्गती सुधारीत धोरण 2019 नुसार अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याकरिता तसेच रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीची माहिती तात्काळ महसूल विभागास प्राप्त होणे व रोक लावण्याची कार्यवाही करण्याकरीता टोल फ्री 1800 233 6890 या क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तरतुद केलेली आहे. जिल्ह्यात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा खनिकर्म कार्यालयउपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचे मार्फत नियंत्रण ठेवण्यात येईल.

शासन निर्णयातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरीता टोल फ्री क्रमांक 1800 233 6890 वर प्राप्त तक्रारीची भरारी पथकाव्दारे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टिने टोल फ्री क्रमांक हा जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यान्वीत असून प्राप्त झालेल्या तक्रारीची नोंद घेऊन संबंधीतास पाठविण्यात येईल. टोल फ्री क्रमांकवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निनावी तक्रारीच्या नोंदी विहीत नमुन्यातील नोंदवहीमध्ये घेण्यात येईल. प्राप्त तक्रारीची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे तसेच संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांचे स्तरावरील गस्तीपथकास यांना विनाविलंब ईमेलदुरध्वनी वर पाठविण्यात येईल.

टोल फ्रि क्रमांक सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयाच्या बाहेर फलक लावून प्रसिध्द करण्यात येईल. प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने करावयाचे कार्यवाहीबाबत परिवहन विभागपोलीस विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. प्राप्त तक्रारीच्या निपटाऱ्याबाबत आवश्यक नोंदी ठेवून उपविभागीय अधिकारीतहसिलदार हे दरमहा मासीक अहवाल जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे सादर करतील.

00000

29 ऑगस्ट पासून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


29 ऑगस्ट पासून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विविध विभागांचा घेणार आढावा

चंद्रपूर दि. 28 ऑगस्ट: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 29 ऑगस्ट शनिवार व 30 ऑगस्ट रविवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादिवशी ते विविध विभागाचा आढावा घेणार आहेत.

शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे आगमन व  कोरोना संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही नगरपरिषदेच्या विकास कामासाठी मास्टरप्लॅन संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. दुपारी 1 वाजता  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्राकरिता चंद्रपूरवरोरा, भद्रावतीसिंदेवाही या तालुक्यातील 145 गावातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केले त्याबाबत मास्टर प्लॅन करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक नियोजन भवन येथे घेणार आहेत.

दुपारी दीड वाजता महानगरपालिका चंद्रपूर शहरालगतच्या 15 गावांच्या पूरनियंत्रण रेषा बाबत बैठक घेणार आहेत. दुपारी दोन वाजता महाविकास आघाडीच्या खासदारआमदारजिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत शासकीय समित्यांवरील अशासकीय सदस्य नियुक्ती करणेबाबत बैठक असणार आहे. दुपारी 3 ते 4 वाजेचा वेळ राखीव असणार आहे. दुपारी 4 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाय अॅश व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत ते अभ्यांगतासोबत थेट संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे प्रयाण करतील व रात्री 9 वाजता रामफुल निवास पोटेगाव रोडगडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गडचिरोली येथे असणार आहेत. दुपारी 2 वाजता गडचिरोली वरून ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सायंकाळी 3 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपूरी वरून नागपूरकडे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता कमलाई निवास रामदासपेठ येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

00000