Search This Blog

Thursday 20 August 2020

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 54 बाधितांची नोंद

 

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 54 बाधितांची नोंद

जिल्ह्यातील बाधितांची संख्या पोहचली 1249 वर

851 कोरोनातून बरे ; 386 वर उपचार सुरु

चंद्रपूर,दि.20 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1249 वर पोहोचली आहे. यापैकीउपचाराअंती 851 कोरोना बाधित बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 386 आहे. गेल्या 24 तासांमध्ये नवे 54 बाधित पुढे आलेले आहेत.

जिल्ह्यात 52 वर्षीय गडचांदूर येथील पुरूषाचा मृत्यू झालेला आहे. बाधित कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रस्त होता. बाधिताला 17 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 ऑगस्टला बाधिताचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केलेले आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 12 असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 10 तर तेलंगाणा राज्य व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथील सुरक्षा रक्षक बाधित आढळल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने स्वतःहून दोन दिवस अलगीकरणात राहणार आहेत. ते विश्रामगृहातूनच कामकाज बघणार असून जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केवळ अत्यावश्यक कामे असणाऱ्यांनीच यावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 22, बल्लारपूर येथील आठमुल येथील चारराजुरागडचांदूर, कोरपनासावली येथील प्रत्येकी एकभद्रावती येथील चार ब्रह्मपुरी येथील 11 तर आसाम येथून आलेला एका बाधिताचा समावेश आहे. असे एकूण 54 बाधित ठरले आहेत.

चंद्रपूर शहरातील तुकूम पोलिस कॉर्टर परिसरातील दोनखत्री कॉलनी एकबाबुपेठ दोनलक्ष्मी नगर  एकजिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षारक्षक एकएसएससी कॉलनी परिसरातील दोनतर शहरातील इतर भागातील सहा बाधित पुढे आलेले आहेत.

बल्लारपूर येथील पोलीस कॉर्टर परिसरातील तीनआंबेडकर वार्ड एकदादाभाई नौरोजी वार्ड एकबालाजी वार्ड दोनरविंद्र नगर एक बाधित आढळले आहे.

मूल येथील दोन तर तालुक्यातील कांतापेठ व ताडाळा येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आलेले आहेत. भद्रावती येथील तीन तर तालुक्यातील सुमठाणा येथील एक बाधित पुढे आला आहे.

ब्रह्मपुरी शहरातील एकहनुमान नगर 2, गांधी नगर 2, सुंदर नगर एकगुरुदेव नगर तर तालुक्यातील चिखलगाव येथील दोनबेटाळा येथील एक बाधित आढळलेले आहे.

जिल्ह्यात 21 हजार 154 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 314 पॉझिटिव्ह असून 20 हजार 840 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 93 हजार 762 नागरिक  दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 64 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 607 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1 हजार 249 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 26 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 98 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 711 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 312 बाधित, 61 वर्षावरील 72 बाधित आहेत. तसेच 1 हजार 249 बाधितांपैकी 861 पुरुष तर 388 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरीलजिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

हजार 249 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1144 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.

00000


No comments:

Post a Comment