Search This Blog

Thursday 13 August 2020

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत डिजिटल मार्केटिंग वेबिनार

 फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम वेबिनार

 युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 13 ऑगस्ट :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूर मार्फत 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 20 ऑगस्ट 2020 रोजी एक दिवस कालावधीचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम कार्यशाळा (वेबिनार) आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत ऑनलाईन शिकविण्याच्या पद्धतीआधुनिक अध्यापन साधनांमध्ये संगणकइंटरनेट सर्फिंगलॅपटॉपइलेक्ट्रॉनिक नोटबुकई-वाचकसंगणक शैक्षणीक खेळऑनलाईन शब्दकोशविश्वकोशचित्र विश्वकोशबोलण्याचे शब्दकोश इत्यादी विषयांवर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि.19 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे ( मो. क्र.9011667717), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर

यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत

डिजिटल मार्केटिंग वेबिनार

चंद्रपूर,दि. 13 ऑगस्ट :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूर मार्फत 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 18 ऑगस्ट 2020 रोजी एक दिवस कालावधीचे डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा (वेबिनार) आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत ऑनलाईन बिजनेस संधीआयडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजीगुगल अॅडव्हर्ड,गुगल अॅनालिटिक्ससोशल मीडिया मार्केटिंगयुट्युबघरी बसून पैसे कमविण्याची संधीउद्योग उभारणी प्रक्रिया इत्यादी विषयांवर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि.17 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे (मो. क्र.9309574045), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment