Search This Blog

Sunday 9 August 2020

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कार्यालय

येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कार्यालय चंद्रपूर येथे आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11  वाजता जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी आदिवासी नेत्यांच्या प्रतिमांना हार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचारी वृंदानी पुष्पार्पण करुन महान नेत्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी इतर कर्मचारी यांनी आदिवासी दिनावर प्रकाश टाकला व पुढे विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना तिमिरातून तेजाकडे नेण्याची कटीबध्दता व्यक्त केली. कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री.मडकाम यांनी सर्वाचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.

0000

No comments:

Post a Comment