Search This Blog

Thursday 13 August 2020

पालकमंत्री ना. वडेट्टीवार 14 ऑगस्टपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


पालकमंत्री ना. वडेट्टीवार आजपासून

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 13 ऑगस्ट : राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 14 ते 17 ऑगस्ट या कालावधीत नागपूरचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या काळात 15ऑगस्ट रोजी ते चंद्रपूर येथे सकाळी 9 वाजता शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

ना. वडेट्टीवार यांचा 14 ऑगस्टपासूनचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. 14 ऑगस्टला सकाळी  नागपूर  येथील रामदास पेठ निवास स्थानावरून ते चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत. चंद्रपूर येथे शासकीय विश्रामगृहावर 14 ऑगस्टला 11.30 वाजता ते पोहोचणार आहे. त्यानंतर 12 वाजता काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बरोबर चर्चा करणार आहेत. दुपारी दीड वाजता खनिज विकास प्रतिष्ठान समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी अडीच वाजता महाविकास आघाडीच्या खासदार आमदारांची बैठक नियोजन भवनातील पालकमंत्री कार्यालयात होणार आहे.

सायंकाळी 5 वाजता हिराई विश्रामगृहे ऊर्जानगर येथे सांडपाणी प्रक्रिया बाबत मुख्य अभियंता महा औष्णिक केंद्र चंद्रपूरआयुक्त महानगरपालिका यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. हिराई विश्रामगृहावर त्यांचा शुक्रवारी मुक्काम राहणार आहे. शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता चंद्रपूर शहरजिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा गांधी चौक येथे आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 7.40 वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 8.50  मिनिटांनी शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील.

 सकाळी बरोबर नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सकाळी 10.30 वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड-19 बाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर जिल्ह्यातील पत्रकारांसोबत 11.30 ला नियोजन भवन येथे चहापानाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे.

शनिवारी 15 ऑगस्ट रोजी चंद्रपूर वरून पद्मापूर किटाळी रस्त्यावरील मोटाघाट नाल्याकडे प्रयाण करतील. मोठा घाट नाल्याची पाहणी 12:45 वाजता ते करणार आहे. दुपारी दोन पासून चंद्रपूर शासकीय विश्रामगृहावर त्यांची वेळ राखीव आहे. दुपारी 3 नंतर शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे अभ्यागतांना सोबत ते संवाद साधतील. रात्री हिराई विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम असणार आहे.

रविवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी चंद्रपूर वरून ते चिमूर कडे प्रयाण करतील. चिमूर येथे सकाळी 10 वाजता त्यांचे आगमन होईल. चिमूर येथे आगमन झाल्यानंतर आगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहतील. हुतात्मा स्मारक चिमूर परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांनी कोरोना संदर्भात उपविभागीय कार्यालय चिमूर येथे बैठक आयोजित केली आहे. दुपारी 12 वाजता चिमूर येथून ते सिंदेवाई जिल्हा चंद्रपूरकडे प्रयाण करतील. वासेरा तालुका सिंदेवाई येथे त्यांचे एक वाजता आगमन होईल. याठिकाणी ते आशिष सदानंद कोहले यांची सांत्वनपर भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी 1.20  वाजता कमळगाव येथे श्री. मसराम यांच्याकडे सांत्वनपर भेट देणार आहे.

दुपारी दीड वाजता सिंदेवाही येथे तहसील कार्यालयात वन हक्क दावे यासंदर्भात आयोजित आढावा बैठक ते घेणार आहेत. दुपारी 3 वाजता सिंदेवाही वरून मेहा (बुज) येथे श्रीमती उषाताई राजेंद्र भोयर यांच्याकडे सांत्वनपर भेट देणार आहे. 4 वाजता मेहा (बुज) येथून सावली वरून आरमोरी गडचिरोलीकडे ते प्रयाण करणार आहेत. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे आगमन झाल्यानंतर श्री. वनमाळी यांच्याकडे सांत्वनपर भेट देणार आहे. सायंकाळी आरमोरी येथून ते गडचिरोली कडे प्रयाण करतील व रानफुल निवासपोटेगाव रोडजिल्हा गडचिरोली येथे त्यांचा मुक्काम आहे.

सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी जिल़्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे कोविड-19 बाबत आढावा बैठक आयोजित केली आहे. 11.30 वाजता गडचिरोली जिल्ह्यातील नदी नाल्यात येणाऱ्या पुरामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत व करावयाच्या उपाययोजना याबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी ठेवली आहे. दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

दुपारी दोन ते अडीच राखीव वेळ असून दुपारी 2 ते 3.30 अभ्यागतासोबत हे चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4 वाजता गडचिरोली वरून ब्रह्मपुरी कडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.45 ला शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे कोरोना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सायंकाळी पाच वाजता तालुकास्तरीय विकासकामांबाबत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 5.30 ते 6.30 महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. सायंकाळी 6:30 वाजता ब्रह्मपुरी वरून ते नागपूरकडे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे आपल्या निवासस्थानी ते पोहोचतील.

00000 

No comments:

Post a Comment