Search This Blog

Thursday 13 August 2020

जिल्ह्यातील बाधितांची संख्या पोहचली 988 वर

 

कोरोनामुळे जिल्ह्यात सातवा मृत्यू

जिल्ह्यातील बाधितांची संख्या पोहचली 988 वर

579 कोरोनातून बरे ; 400 वर उपचार सुरू

24 तासात 44 बाधितांची नोंद

चंद्रपूर,दि. 13 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात 12 ऑगस्टच्या मध्यरात्री 65 वर्षाच्या महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील असून कोरोनामुळे झालेला जिल्ह्यातील सातवा मृत्यू आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 988 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 579 बाधित बरे झाले आहेत. तर सध्या 400 बाधितांवर उपचार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल 944 बाधितांची संख्या होती. आज सायंकाळपर्यंत 988 वर पोहोचली आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 24, चंद्रपूर तालुक्यातील तीनराजुरानागभिडगडचांदूर येथील प्रत्येकी एकबल्लारपूर शहरातील 9, गोंडपिपरी येथील 5 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर शांतीनगर परिसरातील एकशकुंतला अपार्टमेंट रामनगर परिसरात एकहनुमान मंदिर इंदिरा नगर परिसरातील एकफॉरेस्ट एंट्री गेट परिसरातील एकतुकूम परिसरातील तीनऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एकशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील एकअंचलेश्वर गेट भानापेठ येथील एकबापट नगर माता मंदिर जवळील एकगुरुदेव लॉन रिद्धी अपार्टमेंट परिसरातील एकदडमल वार्ड परिसरातील दोनजनता कॉलेज परिसरातील एकलालपेठ चौक येथील दोनसिव्हिल लाईन येथील एकवरवट वार्ड नंबर 3 येथील एकश्री गुरुदत्त संकुल परिसरातील दोनचव्हाण कावेरी कारखाना परिसरातील एक तर निर्माण नगर परिसरातील एका बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापुर परिसरातील ऊर्जानगर येथील दोनवार्ड नंबर 3  नकोडा घुग्घूस येथील एक तर श्रीराम वार्ड नंबर 2 येथील एका बाधिताचा समावेश आहे.

राजुरा येथील धोपटाळा कॉलनी परिसरातील एक बाधित पुढे आला आहे. गोकुळ नगर बल्लारपूर येथील 9 बाधित पुढे आले आहेत.

गोंडपिपरी येथील बीडिओ कॉर्टर परिसरातील एकआझाद हिंद बाजार वार्ड परिसरातील एकवार्ड नंबर 3 परिसरातील एक तर गोंडपिपरी शहरातील दोन बाधितांचा समावेश आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर तर गडचांदूर येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आले आहेत.

जिल्ह्यात 17 हजार 192 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 194 पॉझिटिव्ह असून 16 हजार 998 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 92 हजार 382 नागरिक  दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 864 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 411 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 988 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 18 बाधित6 ते 18 वर्ष वयोगटातील 70 बाधित19 ते 40 वर्षे वयोगटातील 595 बाधित41 ते 60 वर्षे वयोगटातील 239 बाधित61 वर्षावरील 56 बाधित आहेत. तसेच 988 बाधितांपैकी 690 पुरुष तर 298 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरीलजिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

 988 बाधितांपैकी जिल्ह्यातील 885 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 61 आहे.

जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन विषयक माहिती:

जिल्ह्यात सध्या 77 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर 115 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या 115 कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. 401 आरोग्य पथकाद्वारे 17 हजार 419 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या 69 हजार 179 आहे.

00000

No comments:

Post a Comment