Search This Blog

Tuesday 18 August 2020

बेवारस रुग्णांची ओळख असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संपर्क साधावा

 


बेवारस रुग्णांची ओळख असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संपर्क साधावा

चंद्रपूरदि.18 ऑगस्ट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील वार्ड नंबर 7 मध्ये दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी दोन अनोळखी बेवारस पुरुष रुग्ण भरती करण्यात आले आहेत. नातेवाईकपरिचित असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचंद्रपूर येथील वार्ड नंबर 7 येथे संपर्क साधावाअसे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर सोनारकर यांनी केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील वार्ड नंबर 7 मध्ये दिनांक 10 ऑगस्ट रोजी अनोळखी बेवारस  वय 30 वर्ष पुरुष रुग्णाची भरती करण्यात आलेले आहे.सदर रुग्णांचा नोंदणी क्रमांक 35297 व एमएलसी क्रमांक 9475 असून रुग्णासोबत कोणीही नातेवाईक अथवा परिचित व्यक्ती नाही.

तसेच,वार्ड नंबर 7 मध्ये दिनांक 11 ऑगस्ट रोजी अनोळखी बेवारस वय 60 वर्ष पुरुष रुग्णाची भरती करण्यात आलेले आहे. सदर रुग्णांचा नोंदणी क्रमांक 35587 व एमएलसी क्रमांक 9552 असून रुग्णासोबत कोणीही नातेवाईक अथवा परिचित व्यक्ती नाही.

00000

No comments:

Post a Comment