Search This Blog

Saturday 15 August 2020

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव





 

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

चंद्रपूर दि. 15 ऑगस्ट: कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीस्वयंसेवी संस्थाचा  स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी ही लढाई अजून संपलेली नसून लोकांनी यापुढील काळातही कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे, अशा सूचना सुध्दा यावेळी केल्या.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुलेमहापौर राखी कंचर्लावारजिल्हाधिकारी अजय गुल्हानेअपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरनिवासी जिल्हाधिकारी संपत खलाटेमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेअधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सुषमा साखरवाडेजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  डॉ.उदय पाटीलजिल्हा नियोजन अधिकारी ग.रु. वायाळ तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एस. एस. मोरेजिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवारजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांना कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हा रुग्णालय चंद्रपुर अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल भोंगडेडॉ. अविष्कार खांडरेअधिपरिचारिका रजनी आनंदेस्मिता मानकरकिरण वैरागडेवरिष्ठ औषधी निर्माण अधिकारी विवेक माणिक यांना उत्कृष्ट कार्य कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्रामकॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिकारी डॉ.संदीप गेडामअँटीजेन टेस्टिंग नोडल अधिकारी  डॉ.प्रकाश साठेकंटेनमेंट अधिकारी डॉ.प्रतिक बोरकरआईएलआय व सारी रिपोर्टिंग अधिकारी डॉ.प्रीती राजगोपालकॉल सेंटर इन्चार्ज डॉ.माधुरी मेश्रामजिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन राऊतडि.सी.सी.सी कॉल सेंटर अधिकारी डॉ.मीना मडावीजिल्हा वैद्यकीय अधिकारीनगरपरिषद समन्वय अधिकारी डॉ.अनिल कुकडपवारदस्तावेज अधिकारी डॉ.अकील कुरेशीसाथरोग अधिकारी डॉ.सचिन भगतकॉल सेंटर अधिकारी डॉ.किशोर भट्टाचार्यतालुका आरोग्य अधिकारी सिंदेवाही डॉ.ललित पटलेवैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रदुर्गापुर डॉ.अमित जयस्वालआरोग्य सहाय्यक प्रेमचंद वाकडेनितीन झोडेआयईसी समन्वयक अब्दुल वाहाब कुरेशीब्लॉक फॅसीलेटर प्रियंका बुरूलेप्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी गणपती सिडामप्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापुर आशा सेविका किरण दहिवले,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर अंतर्गत वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर सोनारकरसहाय्यक प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र विभाग डॉ.सचिन धगडीडॉ. अपेक्षा नागदेवते, अधिपरिचारिका सपना बावणेवैशाली वाघमारेप्लाज्मा डोनर सुहानी चावरेआशिष बोथराश्याम मेश्राम प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय खेराडॉ.शरयू गावंडेआरोग्य विभाग पिंकी बावणेज्योती व्यवहारेमिथुन लोहकरेमंजुषा वरहातेआशा सेविका वंदना कडस्करसंगीता विशरीजवारसफाई कर्मचारी दिनेश खोटेमहेंद्र खोटे रामकिशोर बिरियादेवानंद छप्परबंदविशाल हातेप्रीतम मलिक तर एनजीओ जगुया थोडसं माणुसकीसाठी व बोहरा समाजसेवा चंद्रपुर यांना गौरविण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावाचा काळात प्रशासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सन्मान तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील तसेच इतर लगतच्या राज्यातील हजारोच्या संख्येने मिरची तोडण्या करिता गेलेले कामगार मे 2020 या कालावधीत गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा या गावातील सीमेवर आले असता सदर कामगारांची व्यवस्था करण्याकरिता पोडसा गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच देविदास सातपुते यांनी प्रशासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोरोना बाधित रुग्णाच्या विलगीकरण करिता विनामुल्य कोविड सेंटर उपलब्ध करून देऊन प्रशासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल इन्स्पायर अकॅडमीचे विजय बदखल व शकुंतला लॉनचे अमोल पत्तीवार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोना कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर कडून केलेल्या उत्कृष्ट कार्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून विवेक कोहळे व कनिष्ठ लिपिक प्रमोद गेडाम यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांचे मूळ गावी पोहोचते करण्याकरिता घेतलेल्या विशेष परिश्रमाकरीता राजुराचे तहसीलदार रवींद्र होळी व गोंडपिपरी तहसीलदार सीमा  गजभिये यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्यातर्फे तहसीलदार संजय राईंचवार यांनी सन्मानपत्र स्वीकारले.

कोरोना कालावधीत प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधील समन्वय साधून प्रशासनाची प्रतिमा उंचावण्याकरिता घेतलेल्या विशेष परिश्रमाकरिता जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालय,चंद्रपूर( पोलीस कोरोना योद्धा) पोलीस निरीक्षक प्रकाश हाकेपोलीस उपनिरीक्षक विकास मुंडेसहाय्यक फौजदार विजय मुकेसुजित बंडीवर ,पोलीस हवालदार दिलीप कुर्जेकारबळीराम पवाररवी चेरकुलवाररमेश गुंडावारनायक पोलीस मिलिंद दोडकेरामराव टेकामपोलीस शिपाई संदीप कांबळीदिलीप इंगळे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयआंतरिक सेवा सुरक्षा पदक मंजूर झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.यामध्ये पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डीपोलीस उपअधीक्षक शेखर पोपट देशमुखपोलीस निरीक्षक किसन शेळकेहृदय नारायण यादवओमप्रकाश कोकाटेस्वप्नील धुळेदीपक गोतमारेसहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश घारेमहेश कोडवारप्रशांत केदारमहेंद्र आंभोरेविनीत घागेरमीझ मुलानीपोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकरविकास मुंढेनिलेश वाघमारेसंदीप कापडेआकाशकुमार साखरेपोलीस शिपाई विशाल बेझलवारसुनील आत्रामनायक पोलीस संतोष पानघाटे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह मंजूर झालेले कर्मचारी सहाय्यक फौजदार विजय मुक्केअहमद अली उस्मान अली, पोलीस हवालदार विजय हरदीयागणपत वाढईसुधीर सायंकार, नायक पोलीस महेश मांढरेप्रकाश बलकीविनोद मुरकुटेविकास आलाम, दिनेश धनविजयमहिला नायक पोलीस श्रीमती मंगला आसुटकर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक मंजूर झालेले कर्मचारी सहाय्यक फौजदार रमेश बरडेजनार्धन मोहुरले यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

00000

No comments:

Post a Comment