Search This Blog

Tuesday 18 August 2020

विधी जनजागृतीद्वारे महिलांचे सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

 विधी जनजागृतीद्वारे महिलांचे सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर,दि. 18 ऑगस्ट: विधी जनजागृतीव्दारे महिलांचे सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ सर्वोच्च न्यायालयनवी दिल्ली तथा कार्यकारी अध्यक्षराष्ट्रीय विधी प्राधिकरण न्यायमूर्ति एन.व्ही.रमणा यांचे शुभहस्ते शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी संपन्न झाला.

सदर अभियान हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय महिला आयोग यांचा संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आले आहे. हे अभियान महाराष्ट्रआंध्र प्रदेशआसाममध्यप्रदेशराजस्थान, तेलंगानाउत्तरप्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यामधील 285 जिल्हामध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये महिलांसाठी 570 विधी साक्षरता कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार असुन त्याव्दारे विविध कायद्यामध्ये महिलांना दिलेले अधिकार व संरक्षण याबाबतच्या तरतुदीची माहिती देणे आणि त्यांच्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षीत करणेहा या अभियानाचा उद्देश आहे.

सर्वोच्च न्यायालयनवी दिल्ली न्यायमुर्ती एन. व्ही. रमणा यांनी शुभारंभ प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कायद्यांबाबत जागरूकता व साधनांचा अभाव असल्यामुळे अनेकदा समाजामध्ये असमानता आढळुन येते. महिलांना पुरोगामी धोरणांचा लाभ मिळत नाही. त्यासाठी धोरण बदलतांना त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.

या प्रसंगी हँन्डबुक ऑन लॉ रीलेटींग टू वुमनआयईसी साहीत्यांचे सर्वोच्च न्यायालयनवी दिल्ली न्यायमुर्ती एन. व्ही. रमणा यांचे शुभहस्ते अनावरण करण्यात आले.

00000

No comments:

Post a Comment