Search This Blog

Sunday 23 August 2020

चंद्रपूरमध्ये 24 तासात 94 बाधितांची नोंद

 

 

चंद्रपूरमध्ये 24 तासात 94 बाधितांची नोंद

आतापर्यत एकूण बाधितांची संख्या 1448

953 बरे ; 480 बाधितांवर उपचार सुरू

चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक बाधित आले पुढे

चंद्रपूर, दि. 23 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 94 बाधित पुढे आले आहे. आज  सर्वाधिक 34 बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील असून बहुतेक बाधित हे संपर्कातून पुढे आले आहेत. 480 बाधितावर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 953 बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती देऊन नोंद व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार 55 वर्षीय बाजार वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त इतर आजार होता. असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. या बाधिताचा 19 ऑगस्टला स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 22 ऑगस्टच्या सायंकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील व परिसरातील 34, वरोरा येथील 13, बल्लारपूर येथील 8, कोरपना व मुल येथील प्रत्येकी 8, भद्रावती येथील 2, पोंभुर्णा व सिंदेवाही येथील प्रत्येकी एक, नागभीड येथील 10, राजुरा येथील 5, ब्रम्हपुरी येथील 4 अशा 94 बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर व परिसरातील गोपालपुरी वार्ड, हनुमान नगर तुकुम परिसरातील, रामनगर, दादमहाल वार्ड, वडगाव, पडोली, बाबुपेठ, पठाणपुरा वार्ड, बालाजी वार्ड इत्यादी परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहेत.

वरोरा येथील अभ्यंकर वार्ड, कर्मवीर वार्ड परिसरातील बाधित पुढे आले आहेत. बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, बालाजी वार्ड, कन्नमवार वार्ड परिसरातील बाधित ठरले आहेत.

कोरपना शहरातील तसेच तालुक्यातील गिरगाव येथील बाधित पुढे आले आहेत. राजुरा विरुर, गांधी चौक टेंभुरवाही परिसरातील बाधित ठरले आहेत. मूल तालुक्यातील बाधितांमध्ये कवडपेठ, फिस्कुटी, कांतापेठ येथील बाधितांच्या समावेश आहे.

नागभीड तालुक्यातील बाळापुर, चिखल परसोडी येथील बाधित ठरले आहेत. ब्रह्मपुरी  गुरुदेव नगर  तसेच तालुक्यातील मेंडकी, गांगलवाडी येथील बाधित पुढे आले आहेत.

अँन्टीजेन तपासणी विषयक माहिती:

जिल्ह्यात 22 हजार 666 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 410 पॉझिटिव्ह असून 22 हजार 253 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 94 हजार 136 नागरिक  दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 22 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 512 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यात  आतापर्यंत 1448 बाधित पुढे आले आहेत. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 29 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 122 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 813 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 369 बाधित, 61 वर्षावरील 85 बाधित आहेत. तसेच एकूण 1448 बाधितांपैकी 986 पुरुष तर 462 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

1448 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1 हजार 342 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 43 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.

00000

3 comments:

  1. Morning la chahawale feriwale poha idly dosa parcel det nasun tyach plate madhe det aani tyach water madhe wash karun punha det, corona spread honyache reasons aahe

    ReplyDelete
  2. The fact is , we have to start living with the virus.

    ReplyDelete
  3. Rajura madhil kontya wardatil rugn aadle...

    ReplyDelete