Search This Blog

Tuesday 18 August 2020

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकपत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार

चंद्रपूरदि. 18 ऑगस्ट: जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकपत्नीपाल्य यांना एकरकमी रुपये 10 हजार व रुपये 25 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिकविधवा यांनी त्यांचे प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

अशी असणार कार्यपद्धती:

सन 2019-20 या वर्षासाठी ऑक्टोंबर, नोव्हेंबर 2020 मध्ये विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित करण्यात येईल. सदर बैठकीमध्ये सैनिक कल्याण विभागामार्फत प्रकरणांची छाननी करून विषेश गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येईल.

नागपूर मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेमध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या पाच माजी सैनिकविधवा यांच्या पाल्यांना एकरकमी रू 10 हजार विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केंद्रीय शिक्षण बोर्डनवी दिल्ली येथुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेड शीट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. तरी सदर प्रकरणासोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह जोडण्यात यावे.

पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापिठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकपत्नी,  पाल्य यांना एकरकमी रू 10 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.

आयआयटीआयआयएमएआयआयएमएस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकविधवा यांच्या पाल्यांना रू 25 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.

00000

No comments:

Post a Comment