Search This Blog

Wednesday 26 August 2020

28 ऑगस्टला दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वेबीनार


 

28 ऑगस्टला दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वेबीनार

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 26 ऑगस्ट: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर कार्यालयांतर्गत दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांकरिता करिअर कॉन्सलिंगमार्गदर्शन कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने अर्थात वेबिनारच्या माध्यमातून होणार आहे. वेबीनारमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक नॅशनल करिअर सर्वीसश्रम व रोजगार मंत्रालयाचे डॉ.अनिल जाधव  राहतील.

सदर दिवशी इच्छुक युवक/युवतींना कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता गुगल मिट अॅप तसेच http://meet.google.com/oxe-syze-rxx या लिंकचा उपयोग करावे. जेणेकरुन दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होता येईल. अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर या कार्यालयाचे  07172-252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन कार्यालयाचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment