Search This Blog

Friday 7 August 2020

युवक-युवतींनी मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा


युवक-युवतींनी मशरूम लागवड

व प्रक्रिया प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे आवाहन

चंद्रपूर,दि. 7 ऑगस्ट :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूर मार्फत 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 17 व 18 ऑगस्ट 2020 रोजी 2 दिवस कालावधीचे मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड यांनी केले आहे.

या प्रशिक्षणामध्ये मशरूमचे प्रकार व ओळखलागवडसाहित्य व कच्चा मालकाळजी व देखभालमशरूम काढणेवाढविणे व पॅकेजिंग प्रक्रियारोगकिडनिदान व उपचारखाद्यपदार्थ व अर्थशास्त्रबाजारपेठ पाहणी तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनाउद्योजकीय व्यक्तिमत्व विकासयशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शनकर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शनइत्यादी विविध विषयावर विशेष तज्ञ मार्गदर्शक व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि.16 ऑगस्ट 2020 रोजी स्वतःचा बायोडाटाशाळा सोडल्याचा दाखलागुणपत्रिकाआधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रउद्योग भवनदुसरा माळागाळा क्र. 208 बस स्टॉप समोररेल्वे स्टेशन रोड,चंद्रपुर येथे उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.940307877307172-274416)कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे ( मो. क्र.9011667717)कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे (मो.क्र.9309574045) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा.

00000 

No comments:

Post a Comment