Search This Blog

Tuesday 18 August 2020

बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी अद्ययावत करावी


 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी अद्ययावत करावी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन

चंद्रपूर,दि.18 ऑगस्ट: कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्य शासनाने संकेतस्थळावर कामगार हवे असलेल्या कंपन्यांना व रोजगार हवा असलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ज्या  बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता आहे. त्यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली नाहीत्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. असे आवाहनजिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केलेली आहे. त्यांनी त्यांची प्रोफाईल दिनांक 31 ऑगस्ट 2020 चे  आत अद्ययावत (जसे- स्वतःचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, संपूर्ण शैक्षणिक पात्रता, अनुभव अवगत असलेली भाषा इत्यादी) करावी.जे उमेदवार अद्ययावत करणार नाही त्यांची स्वतःची नोंदणी दिनांक 31 ऑगस्ट 2020 नंतर आपोआप पोर्टलवरून रद्द होईल. याची कृपया नोंद घ्यावी सदर नोंदणी ही विनामूल्य असेल अधिक माहितीची आवश्यकता असल्यास व काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाचा दूरध्वनी 07172-252295 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

 

No comments:

Post a Comment