Search This Blog

Monday, 10 August 2020

शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतरिम निकाल जाहीर


 शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतरिम निकाल जाहीर

चंद्रपूर, दि.10 ऑगस्ट: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2019 पेपर 1 व पेपर 2 चा अंतरिम निकाल दि.5 ऑगस्ट 2020 रोजी परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पेपर 1 व 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाबाबत पात्रतेसाठी आरक्षण वर्गवैकल्पिक विषयअपंगत्व इत्यादींचा लाभ मिळाला नसल्यास परिषदेकडे दि. 15 ऑगस्ट 2020 पर्यंत कागदपत्र पुराव्यासह उमेदवारांच्या लॉगिन मधून ऑनलाईन रित्या तक्रार व आक्षेप नोंदविता येईल. ऑनलाइन आवेदन पत्र यातील माहितीनुसार निकाल तयार करण्यात आलेला असून त्यात तफावत आढळून आल्यास त्याबाबत परिषदेकडून विचार केला जाईल.

उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी( प्राथ.)जि.प. शिक्षण निरीक्षकमुंबई यांच्यामार्फत यथावकाश पाठविण्यात येईल.याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी ( प्राथ.) दिपेंद्र लोखंडे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment