Search This Blog

Tuesday, 18 August 2020

27 ऑगस्टला ऑनलाइन रोजगार मेळावा

 

27 ऑगस्टला ऑनलाइन रोजगार मेळावा

युवक, युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 18 ऑगस्ट: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाचे वतीने दिनांक 27 ऑगस्ट, 2020 रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.in या वेबपोर्टलवर स्वतःचे नांव नोंदणी करुन किंवा ज्यांनी यापूर्वी नावनोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी  युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करावे. उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींगच्या माध्यमातून मेळाव्याचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment