Search This Blog

Tuesday 25 August 2020

जिल्ह्यात 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर पर्यंत फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन


 जिल्ह्यात 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर पर्यंत फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.25 ऑगस्ट: युवा व खेल मंत्रालयनवी दिल्ली यांनी पुढाकार घेवून फिट इंडिया फ्रीडम रन या नविन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. सदर उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यपुणे अंतर्गत दि. 29 ऑगस्ट 2020 ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत आयोजीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकखेळाडूयुवक-युवती व शाळेतील विद्यार्थी यांनी सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी केले आहे.

फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन ही चळवळ दिनांक 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा मागील संकल्पना अशी आहे की तुम्ही कोठेहीकथीही पळूचालु शकता. प्रत्येक जण धावण्यासाठीचालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्गव्यक्तिशः अनुकुल वेळ निवडू शकतात. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणेचालणे करु शकणार आहेत. प्रत्येकास स्वतःच्या वेगाने धावणेचालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग अॅप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावलेल्याचाललेल्या अंतराचा वेळ व अंतराची माहिती घ्यावी.

फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील नागरीक व जेष्ठ नागरीकखेळाडू विविध संघटनेचे खेळाडूयुवक युवती व शाळेतील विद्यार्थी यांना सामाजिक अंतर राखण्याच्या निकषानुसार दि. 29 ऑगस्ट ते ऑक्टोंवर 2020 या कालावधीत धावणेचालणेसायकल चालविणे करिता आपली वैयक्तीक माहिती (नावई-मेलसंपर्क क्रमांकधावण्याची तारीखअंतरराज्यजिल्हातालुका व गावाचे नांववार्ड क्र. इत्यादी तसेच अंतर धावलेलीचाललेली व सायकल चालविल्याची माहिती) या कार्यालयात दि. 29 ऑगस्ट ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत दर दोन दिवसांनी dso_new@rediffmail.com या ईमेल वर किंवा हॉट्सअप क्रमांकावर 9673583677 किंवा 9970778217 (अंतर धावलेली,चाललेली) माहिती सादर करावी. सदर सहभागी नागरीकखेळाडूयुवक-युवती व शाळेतील विद्यार्थी यांना भारत सरकार तर्फ विहित नमून्यातील प्रमाणपत्र या कार्यालयामार्फत प्रदान करण्यात येईल. अधिक माहिती करिता www.fitinida.gov.in या वेबसाईटवर भेट दयावी.

00000

No comments:

Post a Comment