Search This Blog

Friday 28 August 2020

29 ऑगस्ट पासून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


29 ऑगस्ट पासून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विविध विभागांचा घेणार आढावा

चंद्रपूर दि. 28 ऑगस्ट: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 29 ऑगस्ट शनिवार व 30 ऑगस्ट रविवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादिवशी ते विविध विभागाचा आढावा घेणार आहेत.

शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे आगमन व  कोरोना संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही नगरपरिषदेच्या विकास कामासाठी मास्टरप्लॅन संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. दुपारी 1 वाजता  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्राकरिता चंद्रपूरवरोरा, भद्रावतीसिंदेवाही या तालुक्यातील 145 गावातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केले त्याबाबत मास्टर प्लॅन करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक नियोजन भवन येथे घेणार आहेत.

दुपारी दीड वाजता महानगरपालिका चंद्रपूर शहरालगतच्या 15 गावांच्या पूरनियंत्रण रेषा बाबत बैठक घेणार आहेत. दुपारी दोन वाजता महाविकास आघाडीच्या खासदारआमदारजिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत शासकीय समित्यांवरील अशासकीय सदस्य नियुक्ती करणेबाबत बैठक असणार आहे. दुपारी 3 ते 4 वाजेचा वेळ राखीव असणार आहे. दुपारी 4 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाय अॅश व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत ते अभ्यांगतासोबत थेट संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे प्रयाण करतील व रात्री 9 वाजता रामफुल निवास पोटेगाव रोडगडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गडचिरोली येथे असणार आहेत. दुपारी 2 वाजता गडचिरोली वरून ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सायंकाळी 3 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपूरी वरून नागपूरकडे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता कमलाई निवास रामदासपेठ येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

00000

No comments:

Post a Comment