Search This Blog

Saturday, 1 August 2020

शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत जिल्हा स्तरीय समितीची सभा

शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत

जिल्हा स्तरीय समितीची सभा

चंद्रपूरदि. 1 ऑगस्ट : जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस विभागामार्फत शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीबाबत नियंत्रण समितीची दर महिन्यात आयोजित करण्यात येणारी मासिक सभा दिनांक 30 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा स्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

ज्या शेतकऱ्यांनी कर्ज बाजारीपणामुळेच आत्महत्या करण्यात आली. त्यांच्या वारसांना तालुका स्तरीय समितीने आपले अहवालात मत व्यक्त केले आहे. तरीपण उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी सदर प्रकरणी पात्र करण्यात आले आहे. त्यांना प्रशासनातर्फे मदत करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांनी स्पष्ट केले. इतर कारणाने आत्महत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना हे लाभ मिळणार नाही असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत 2020 पर्यत शेतकऱ्यांनी  केलेल्या आत्महत्या, महसूल विभागानी मंजूरीबाबत जानेवारी 2020 पर्यत ज्या शेतकऱ्यांचे नापीकी, कर्जबाजारीपणाकर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणानी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यास  शासनाकडून आर्थिक मदत देय आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वारसास मदत देण्याबाबत आढावा या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी विनय राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमोद गेडाम तसेच पोलिसकृषी विभागाचे प्रतिनिधी व संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment