Search This Blog

Wednesday, 4 October 2023

वाघनखं भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी



 

वाघनखं भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी

Ø तमाम शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक क्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ø शिवबाच्या महाराष्ट्रात वाघनखं दर्शनाला नेण्याचं सौभाग्य

प्राप्त होतंय याचा अभिमान : ना. सुधीर मुनगंटीवार


लंडन / चंद्रपूरदि. 4 :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठीअवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याच्या संकल्प राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्यानुसार वाघनखे आणण्याचा सामंजस्य करार मंगळवारी संपन्न झाला. यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून  बोलत होते. यावेळी राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारउद्योग मंत्री उदय सामंतमुख्यमंत्री तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेपुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गेमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधवव्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंटभारताचे लंडनमधील उच्चायुक्तत्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघनखं शिवभूमीत आणत आहोतहा दुग्धशर्करा योग असून शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवराज्याभिषेकाच्या निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने हा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेलात्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांचे  अभिनंदन केले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री. मुनगंटीवार म्हणाले कीआयुष्यातील महत्वाच्या आणि संस्मरणीय प्रसंगापैकी एक असा आजचा हा प्रसंग आहे. रयतेच्या रक्षणासाठी मृत्यूच्या दाढेत स्वतःला झोकून ज्या क्रूर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला, ती वाघनखं माझ्या शिवबाच्या मातृभूमीतमहाराष्ट्रात शिवप्रेमींच्या दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय, हा अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नव्हते तरी आमच्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नाहीतते आमचा स्वाभिमान आहेतती आमची प्रेरणा आहेती आमची ऊर्जा आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य विभागाने केलेला संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पूर्णत्वाकडे जातोय याचा अतिशय आनंद होतोय, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ना. मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले कीमहाराष्ट्र शासन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया अँण्ड अल्बर्ट म्यूझियम यांच्या दरम्यान जो सामंजस्य करार झालात्यानुसार ही वाघनखं नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमीइतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारानागपूरकोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.

 मंत्री सुधीर मुनगंटीवार करारासाठी संग्रहालयात जाण्यापूर्वी त्यांचे लंडन येथील मराठी बांधवांनी मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केलेत्यानंतर संग्रहालयातील इतर सर्व वस्तू बघत असताना शिवकालीन तसेच भारतातील इतर वस्तूंची त्यांनी कुतूहलाने माहिती जाणून घेतली. त्यानंतर स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.

००००००

No comments:

Post a Comment