Search This Blog

Thursday 12 October 2023

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियत्रंण कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

 

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियत्रंण कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

चंद्रपूर दि. 12 : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियत्रंण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपुत, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, महिला व बालकल्याण संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकरआदींची उपस्थिती होती.

 

 

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व ज्येष्ठ नागरीक, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्यदायी जिवनासाठी व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी कॅन्सर जनजागृती उदघाटन कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिर व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शासकिय नर्सिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हदयरोग आजाराबद्दल तसेच सी.पी.आर.पथनाट्याद्वारे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिरामध्ये  नियतवयोमानाने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

००००००

No comments:

Post a Comment