Search This Blog

Wednesday 25 October 2023

शिक्षणासोबतच संस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावे








 

शिक्षणासोबतच संस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावे

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

Ø मेरी माटीमेरा देश’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण

चंद्रपूरदि. 25 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिलेला मेरी माटीमेरा देश’ अंतर्गत मिट्टी को नमन... विरो को वंदन’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर संस्कृतीचे रक्षण करून देशाची प्रगती करण्याचा संकल्प आहे. शिक्षण हे केवळ पोटभरू नसावे. तर राष्ट्रसंतांच्या शिकवणीप्रमाणे माणूस द्या मज माणूस द्या’ या कृतीनुसार शिक्षणासून संस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेअसे आवाहन राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात जिल्हा परिषदेद्वारे आयोजित मेरी माटी मेरा देश’ या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनजिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशीशिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारेकल्पना चव्हाण (माध्य.)उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरेविशाल देशमुख उपस्थित होते.

आपला जिल्हा हा सर्वाधिक वाघांचा जिल्हा आहेत्यामुळे प्रत्येक कामात वाघासारखा पराक्रम दिसला पाहिजेअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेजिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारीत काढलेले छायाचित्रव त्याचे प्रदर्शन अप्रतिम आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात एकच भाव आहेआणि ते म्हणजे देशाविषयी प्रेम. त्यामुळे या प्रेमाला संस्काराचे खतपाणी देणेही आपली जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधिकारासोबतच कर्तव्यजबाबदारी आणि दायित्वसुध्दा सांगितले आहे. त्यामुळे स्वत:मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. स्वत:ला आरशात बघितले तर बदल घडविणारा हा स्वत:मध्येच दिसेलअसे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणालेजिल्ह्यात मेरी माटी मेरा देश हा कौतुकास्पद कार्यक्रम सर्व ग्रामपंचायत आणि नगर पंचायतीमध्ये तसेच महानगरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रत्येकाच्या योगदानातूनच हा देश मोठा होईल. विद्यार्थी हे देश निर्माणामध्ये मोठी भुमिका निभावू शकतात. आजचे विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेअसे ते म्हणाले. तर पोलिस अधिक्षक श्री. परदेशी म्हणालेचित्रकलानृत्य आदी स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे कलागुण दिसले. जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणादायी हिरे दिले आहेतअसे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणालेजिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत गावस्तरावर तसेच तालुका स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आज जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावाविद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावाया उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेअसे ते म्हणाले. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणा-या विविध अभिनव उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ब्रेललिपीमध्ये : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. शिवाजी महाराज हे विरतापराक्रमाचे प्रतिक आहेत. त्यामुळे त्यांचा इतिहास डोळे नसलेल्या अंध नागरिकांनासुध्दा वाचता यावायासाठी ब्रेललिपीमध्ये करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सिंगापूरच्या कॉन्सुलेट जनरलकडून चंद्रपुरातील विकासकामांचे कौतुक : गत आठवड्यात सिंगापूरचे कॉन्सुलेट जनरल यांनी चंद्रपूर येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी येथील सैनिक शाळाबॉटनिकल गार्डनवनअकादमीची पाहणी केली. सिंगापूरला परत गेल्यावर त्यांनी तेथून लेखी पत्र लिहून चंद्रपुरातील विकास कामांचे कौतुक केले आहे.

जिल्ह्यात वैमानिक होण्याची संधी : चंद्रपूर जिल्ह्यात एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र तसेच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडत आहे. आता तर चंद्रपूर येथे तयार होणा-या फ्लाईंग क्लबच्या माध्यमातून केवळ दोन ते अडीच लाखांत जिल्ह्यातील तरुण – तरुणींना वैमानिक होण्याची संधी प्राप्त होणार आहे. यापूर्वी मिशन शौर्य अंतर्गत जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला आहे.

ऑलंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा : जिल्ह्यात खेळाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तिनही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. सैनिक स्कूल येथील फुटबॉलचे मैदान हे जागतिक दर्जाचे आहे. मूलबल्लारपूरपोंभुर्णाचंद्रपूर येथे अत्याधुनिक स्टेडीयमची उभारणी करण्यात आली आहे. चंद्रपूरात शहीद बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे स्टेडीयम साकारण्यात येणार आहे. सन 2036 मध्ये ऑलंपिक स्पर्धा भारतात घेण्याचे नियोजन आहे. जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषदेने क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवावेत. ऑलंपिकमध्ये जिल्ह्याचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न कराअसे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विजेत्यांचा सत्कार : तत्पुर्वी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकला प्रदर्शनीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यात देशभक्तीपर समूह नृत्य (इयत्ता ते 8) स्पर्धेतील वरोरा येथील कर्मवीर विद्यालयजि.प.उच्च प्राथमिक शाळाआंबेझरीनागभीड येथील अनुसयाबाई पोषेट्टीवार विद्यालयइयत्ता ते 12 वी गटात जि.प. हायस्कूल पाथरीआयडीयल इंग्लीश स्कूल बल्लारपूरमहात्मा गांधी विद्यालय गडचांदूर यांचा समावेश होता. तर देशभक्तीपर वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील आनंदी रामटेकेसुमित राऊत चेतना मोहितकरचित्रकला स्पर्धेतील समय पारखीकेतकी किनेकरआर्यन सातपुतेसंस्कार जिडगीलवारआदित्य मेश्रामदिव्यांशी गुडरूवक्तृत्व स्पर्धेतील वैष्णवी बोढेसनिया पालयोगेश्वरी बामणेनंदिनी वालदेप्रणाली नागापुरेनिबंध स्पर्धेतील श्रध्दा गद्देवारचतुर्थी वंजारीअक्षरा अहिरकरश्रध्दा जुनघरेजानवी वाढईसलोनी डोहानेरांगोळी स्पर्धेतील अक्षरा निमसरकारचैताली पाठककेतकी किनेकरकामेश्वरी गुंडेजवारकुमूद कुर्जेकरचांदणी खोबरे यांचा समावेश होता.

००००००

No comments:

Post a Comment