Search This Blog

Friday, 27 October 2023

जिल्हाधिका-यांनी केली बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पाहणी



 

जिल्हाधिका-यांनी केली बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पाहणी

चंद्रपूर, दि. 27 : चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राला (बीआरटीसी) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विजय पवार, बी.आर.टी.सी. चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी.मल्लेलवारनायब तसीलदार श्री. खंडाळेवनपाल श्री. कोसनकरतलाठी श्री. आत्राम तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी प्रकल्प परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामागर्फत चालू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या विविध बांबू इमारती, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत सुरू असलेले अल्पमुदत आणि दीर्घमुदत बांबू प्रशिक्षण कार्यक्रमबांबू सेटम येथे लावलेल्या विविध बांबू प्रजातीबांबू प्रक्रिया प्रकल्प इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली. येथे सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करून सदर प्रकल्प बी.आर.टी.सी. यांना हस्तांतरीत करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले.

तसेच आगीच्या दृष्टिने धोकादायक असणारे स्थळ जसे विद्युत विभाग परिसरहनुमान मंदिर परिसर याबाबत जिल्हाधिका-यांना माहिती देण्यात आली. प्रकरणी जागा पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी तहसीलदार विजय पवार यांना दिले.

००००००

No comments:

Post a Comment