Search This Blog

Wednesday 25 October 2023

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका मोहीमेमुळे 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार

 

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका मोहीमेमुळे 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार

पी एम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने राबविली विशेष मोहीम

मुंबई (दि.25) - महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पी एम किसानचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबवली होती. या मोहिमेद्वारे राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत.

कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पुढाकार घेऊन कृषीमहसूलभूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणेभूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणेआधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र करवून घेतले आहेत.

पी एम किसान योजना जेव्हा नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे 95 लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने 13 व्या आणि 14 व्या हप्त्यात त्यापैकी 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना पी एम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. 15 व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे.

मुळात 95 लाख पैकी मयतकर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून 92.87 लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. पण त्यांपैकी 82.59 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले होते.

धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर ग्राम पंचायत पदाधिकारीकृषिमित्रयांसह कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊनबांधावर जाऊन 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरणबँक खाते संलग्न करणेभूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेतली. यामध्ये 9.58 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे2.58 लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे1.29 लाख शेतकऱ्यांचे भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे बाबत कामकाज पूर्ण झाले आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी सातत्याने विभागाच्या बैठका घेऊन वारंवार आढावा घेतल्याने या कामाला आणखीनच गती प्राप्त झाली.

शिर्डीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता होणार एका क्लिकवर वितरित

दरम्यान राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.26) रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

0000000

No comments:

Post a Comment