Search This Blog

Thursday 26 October 2023

शेतक-यांनी धान विक्रीकरीता शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी

 

शेतक-यांनी धान विक्रीकरीता शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी

चंद्रपूरदि. 26 :  केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत आदिवासी विकास महामंडळ धानाची खरेदी करीत असते. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशान्वये जिल्हयात संस्था आणि महामंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयातंर्गत उपप्रादेशिक कार्यालय चिमुर व गोंडपिपरी अंतर्गतहंगाम 2023-24 करीता आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे एकूण 34 धान खरेदी केंद्र व आदिवासी विकास महामंडळाचे 1 असे एकूण 35 खरेदी केंद्र धान खरेदीकरीता मंजुर करण्यात आले आहे.

सदर केंद्रांवर धान विक्रीस आणण्याकरीता शेतक-यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.  जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांनी जवळचे आदिवासी विकास महामंडळ किंवा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या खरेदी केंद्रास जावून ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच आपल्या बँक खात्याची केवायसी पूर्ण करावी. त्यासोबतचजिल्हयातील सर्व शेतक-यांनी शासनाच्या पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment