Search This Blog

Wednesday, 4 October 2023

लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : ना. सुधीर मुनगंटीवार





 

लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : ना. सुधीर मुनगंटीवार

पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत

भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला स्वागत आणि अभिनंदन सोहळा !

लंडनदि. ४: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक करोड कोहिनूर ओवाळून टाकावेअसा राजा होय. छत्रपती  शिवाजी महाराज आमच्यासाठी देव जरी नसतील तरीही देवापेक्षा कमी नक्कीच नाहीतया महानायकाचा  अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमित  उभारण्यासाठी मी आणि महाराष्ट्र सरकार  पूर्ण सहकार्य करेलतुम्ही पुढाकार घ्या मी पुतळा देईनअशी ग्वाही राज्याचे वने,  सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

विजापूरचा मुगल सरदार अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी महाराजांनी बाहेर काढला ती वाघनखे परत मिळविण्यासाठी  ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर ना. मुनगंटीवार यांचा  लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी भव्य समारंभ आयोजित करुन सत्कार केला. या सोहळ्यात ते बोलत होते.

ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले,  मला जेव्हा सूचना केली कीलंडन येथे  छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर पुतळा  उभा करावातेव्हा मला अतिशय आनंद झालामी लगेच संमती दिली. यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने तुमच्या पाठिशी उभे राहील.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी विचार विश्वात पोहचावाअशी  आमची अपेक्षा आहे.  हा विचार जगातील प्रत्येक देशापर्यंतदेशातील प्रत्येक राज्यापर्यंतराज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंतजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंततालुक्यातील प्रत्येक गावांपर्यंतगावातील प्रत्येक घरापर्यंतघरातील प्रत्येक आई-बहिणी पर्यंत,  पोहचविण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने केला आहॆ. यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहेअसेही ते म्हणाले.

लंडनच्या मराठी बांधवांचे आभार मानताना ना. मुनगंटीवार म्हणालेआयुष्यामध्ये अनेक आनंदाचे क्षण येतात. त्यापैकी आजचा एक  आनंदाचा क्षण आहे. तुमच्या सर्वांची भेट घेतानातुमच्याशी संवाद साधतानातुमचं दर्शन घेताना मलाही मनापासून आनंद होतोय. जगातील १९३ देशात देशांत सर्वांत श्रेष्ठ भारत असून त्यात आमचा महाराष्ट्र महान आहे .

ते म्हणाले मी भाग्यवान आहेसांस्कृतिक मंत्री म्हणून शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी काम करण्याची संधी मिळाली. आग्र्याच्या किल्यात जेथे महाराजांचा अपमान झाला तेथेच भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करुन अभिवादन केलेराज्यात ठीकठिकाणी जाणता राजा महानाटय़ाचे प्रयोग असे कितीतरी उपक्रम राबविण्याची संधी मिळाली. आमचा राजा शूर होतावीर होताहिंदवी स्वराज्याचा संस्थापक होतात्यामुळे मराठी मातीशी नाळ जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात फक्त शिवबाच असावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामंजस्य करार करण्यास ना. सुधीर मुनगंटीवार लंडनला येणार हे कळल्यापासूनच स्थानिक शिवप्रेमी मराठी बांधव उत्साहित होते. मंगळवारी दुपारी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट मुझियम जवळ ना. मुनगंटीवार पोहोचताच  पारंपरिक मराठमोळ्या वेषातढोलताशांच्या गजरात त्यांचे  स्वागत या महाराष्ट्र मंडळाने केले. सामंजस्य करार झाल्यानंतर अतिशय देखणा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला. स्फुर्तीगीतपोवाडापारंपरिक नृत्यछत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग अशा विविध छटांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

00000

No comments:

Post a Comment