Search This Blog

Saturday 28 October 2023

जिल्हाधिका-यांचा पुनर्वसित भगवानपूर येथील गावकरी व विद्यार्थ्यांशी संवाद

 





जिल्हाधिका-यांचा पुनर्वसित भगवानपूर येथील गावकरी व विद्यार्थ्यांशी संवाद

Ø  मूलभूत सोयीसुविधांबाबत अधिकाऱ्यांना सूचना

चंद्रपूरदि. 28 : मूल तालुक्यातील पुनर्वसित भगवानपूर येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देवून येथील मूलभूत सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी  गावक-यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.

भद्रावती तालुक्यातील बोटेझरी  व चंद्रपूर तालुक्यातील कोळसा येथून प्रकल्पबाधित नागरिकांचे सन 2007 व 2012 अशा 2 टप्प्यांमध्ये मुल तालुक्यातील भगवानपूर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील पुनर्वसित नागरिकांना पुरविण्यात आलेल्या मूलभूत सोयीसुविधांबाबत त्यांनी गावक-यांचे म्हणणे ऐकून घेतले. गावातील  नागरिकांना योग्यरीत्या जनसुविधांचा लाभ मिळावायाबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. त्यामध्ये पिण्याचे शुद्ध पाणीसमाजमंदिरपाणंद रस्तेशहरांना जोडणारे रस्तेतलावाचे कामभोगवटादार वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेइत्यादी कामांबाबत जिल्ह्याधिका-यांनी निर्देश दिले.

जिल्हाधिका-यांचा विद्यार्थ्यांशी संवाद : यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी  जि. प. प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शाळेमधील विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळनायकशिक्षणमंत्रीइ. कसे वर्गावर नियंत्रण ठेवतात व वेगवेगळे उपक्रम राबवतातहे जाणून घेतले. सोबतच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे पोषण आहारपाणी सुविधासंरक्षण भिंतमैदान याबद्दल माहिती घेतली.

शिबिराच्या माध्यमातून लाभ द्या : मौजा भगवानपूर येथे तहसील कार्यालय मुलचंद्रपूरभद्रावती व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयचंद्रपूरतर्फे आयोजित केलेल्या शिबिरामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना आदिवासी शबरी घरकुल आवास योजना तसेच उत्पन्न प्रमाणपत्रजात प्रमाणपत्र आदीबाबत लाभ द्यावाअसेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी मुलचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळीगट विकास अधिकारी बी. एच. राठोडवन परिक्षेत्र अधिकारीभगवानपूरचे सरपंच व गावकरी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment