Search This Blog

Monday 23 October 2023

हरविलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

 हरविलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 23 : भिवापूर वार्ड, नुराणी मस्जीद जवळील रहिवासी एजाज सरफराज खान वय 36 वर्षे  हे अजमेर दर्गा येथे दर्शनासाठी जातो असे सांगून घरून निघून गेले. दोन दिवसांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता तो बंद दाखवित होता. नातेवाईक, मित्राकडे विचारपूस केली असता माहिती नसल्याचे आढळून आले. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, बाबुपेठ, लालपेठ परीसरात शोध घेतला असता सदर व्यक्ती मिळून आला नाही.

हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे:

सदर व्यक्तीचे वय 36 वर्ष, रंग सावळा, चेहरा लांबट गोल, मजबुत  बांधा, केस काळे, डोळे बारीक, अंगात लाल पांढऱ्या व काळया  रंगाचा टि-शर्ट, सिंमेट रंगाचा जिन्सपॅन्ट तर पायात स्लिपर घातलेली आहे. सदर वर्णनाची व्यक्ती परिसरात आढळून आल्यास हरवलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी, असे आवाहन शहर पोलीस स्टेशन,चंद्रपूर मार्फत करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment