नवरात्रोत्सवानिमित्त रॅली दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
Ø नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलीस प्रशासना
चंद्रपूर, दि. 20 : चंद्रपुर शहरात 23 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत माता महाकाली मंदिरापासुन नवरात्रोत्सवानिमित्त रॅली निघणार आहे. सदर रॅली माता महाकाली मंदिर-गिरणार चौक-गांधी चौक जटपुरा गेट-परत मौलाना चौक-गिरणार चौक ते माता महाकाली पर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951 च्या कलम-33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी सदर रॅलीकरीता असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास व गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणेबाबतची अधिसुचना पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमीत केली आहे.
दि. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत माता महाकाली मंदिर-गिरणार चौक-गांधी चौक-जटपुरा गेट-परत मौलाना चौक-गिरणार चौक ते माता महाकाली मंदिर पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. तसेच हा मार्ग “नो पार्कंग झोन आणि नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे.
या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा :
बल्लारपूरकडून येणाऱ्या तसेच बाबुपेठ, बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गाचा वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चारचाकी वाहनांने बाहेर जाण्यासाठी किंवा परत येण्यासाठी लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट-बिनबागेट या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर ईतरत्र जाण्यासाठी कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा. नागपूर व मुलकडून शहरामधील पंचशिल चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपुरा परिसर वार्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरीकांनी (जड वाहने वगळून) वरोरा नाका-संत केवलराम चौक-विदर्भ हाउसिंग चौक -रहेमतनगर – बिनबा गेट मार्गाचा वापर करावा. तसेच नागपूर व मुलकडून शहरामधील रामाळा तलाव, बगड खिडकी, गंजवार्ड, भनापेठवार्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरीकांनी (जड वाहने वगळुन) सावरकर चौक-बस स्टॅन्ड चौक-आर.टी.ओ. ऑफिस- रयतवारी कॉलरी या मार्गाचा वापर करावा.
यात्रेकरीता बाहेरून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था : (नियोजीत वाहनतळ)
डी.एड. कॉलेज बाबुपेठ, राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज, श्री. बागला यांची खाजगी जागा (बागला चौकीजवळ), बैल बाजार (माता महाकाली मंदिरासमोर), श्री. चहारे यांची जागा (चहारे पेट्रोलपंपच्या मागे), श्री. कोठारी यांची खाजगी जागा (महाकाली मंदिरासमोर), श्री. पटेल यांची खाजगी जागा (महाकाली मंदिरासमोर) आणि कोहीनुर तलाव ग्राउंड (अंचलेश्वर गेटजवळ) ही नियोजित वाहन स्थळे असून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरीकांनी निर्देशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment