Search This Blog

Wednesday, 25 October 2023

28 ऑक्टोबर रोजी ब्रह्मपुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन

 28 ऑक्टोबर रोजी ब्रह्मपुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या

नुतन इमारतीचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 25: ब्रह्मपुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन मुंबई खंडपीठ, नागपूर येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा पालक न्यायमुर्ती अविनाश घरोटे यांच्या हस्ते आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडणार आहे.

सदर उद्घाटन कार्यक्रम शनिवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता नविन न्याय मंदिर इमारत, ब्रह्मपुरी येथे संपन्न होत आहे. असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment