Search This Blog

Wednesday 4 September 2024

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार बोलीभाषेत शिक्षण

 

आदिवासी  विद्यार्थ्यांना मिळणार बोलीभाषेत शिक्षण

Ø पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक भाषांमध्ये रुपांतर

चंद्रपूरदि. 4 :  राज्यातील काही आदिवासी बहुल भागात कोलामीमाडियागोंडीवारली यासारख्या   भाषांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जातो. तर या भागातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शैक्षणिक भाषेचा विरोधाभास तसेच मातृभाषेतील बालवाचन पुस्तकांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे  निर्माण  होतात. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक बोली भांषामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळणार आहे. 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावं, यासाठी केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयच्या निर्देशानुसार  इयत्ता 1 ली ते 4 थीच्या मराठी बालभारती क्रमिक पाठयपुस्तकांचे महाराष्ट्रातील कोरकु, गोंडी, भिल, माथवाडीमावची माडियाकोलामीभिल बसावेभिल-भिलावूवारली कोकणा/ कोकणीपावरी व कातकरी या 12 बोलीभाषेत अनुवाद करण्यात येत आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात  टीआरटीआयने  त्यांच्याकडे असलेल्या बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांचे भाषांतर करून शासकीय आश्रमशाळासाठी  उपलब्ध केले. त्यामाध्यमातून आदिवासी बहुल भागातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी व शिक्षकांना बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे नेले जाणार आहे.

दरम्यानपहिल्या टप्प्यात पहिली व दुसरीचे अनुक्रमे 8682 व 8762 असे एकूण 17 हजार 444 पाठयपुस्तके उपलब्ध झाली आहे. या पुस्तकांचे वितरण आश्रमशाळा स्तरावर सुरू आहे. उर्वरित पाठयपुस्तके लवकरच प्राप्त होणार असून त्यांनतर त्यांचेही आश्रमशाळा स्तरावर वितरण केले जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

           राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण स्थानिक बोली भाषेत देण्याचा मानस आहे. जेणेकरून प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृध्दींगत होणे सुलभ होईल. बोलीभाषा ते प्रमाणभाषा असा विद्यार्थ्यांचा अध्ययन प्रवास असेल. त्यासाठी क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक भाषांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे म्हणाल्या.

बोलीभाषानिहाय अनुवादित पाठयपुस्तकांची संख्या : कोरकु-1643गोंडी-2653भिल माथवाडी -3406मावची-1576माडिया-1320कोलामी-210भिलबसावे-1596भिल- भिलावू-2209 वारली - 8244कोकणा/कोकणी-6989पावरी- 6493कातकरी - 1046,  एकूण -  37385

००००००

No comments:

Post a Comment