आदिवासी मेळाव्यानिमित्त पोंभुर्णा येथील
वाहतूक व्यवस्थेत बदल
चंद्रपूर,दि.30 : दि. 1 ऑक्टोबर रोजी
पोंभुर्णा येथे आदिवासी मेळाव्यासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार
असल्यामुळे सदर मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित राहणार आहेत. दौरा
कार्यक्रम असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा
अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला नाहक त्रास होऊ नये म्हणून पोंभुर्णा येथील वाहतूक
व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6
वाजेपर्यंत गोपाल नगर टी पॉईंट ते पोंभुर्णा व देवाळा गाव ते पोंभुर्णा पर्यंत जड
वाहतूक बंद राहील. तसेच आवश्यकतेनुसार सदर कालावधीत ठराविक वेळेकरीता सर्व
प्रकारची वाहतूक बंद करण्यात येईल. या कालावधीत जड वाहतूकदार व इतर वाहतुकदारांनी
पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.
1.
चंद्रपूरकडून पोंभुर्णा किंवा गोंडपिपरीकडे जाण्याकरीता गोपाल नगर टी पॉईंट- बोडा
गाव- उमरी टी पॉईंट – बोर्डा (बोरकर) टी पॉईंट- बोर्डा दीक्षित- बोर्डा फाटा- नवीन
गंगापूर- कसरगटा- पोंभुर्णा या रस्त्याचा अवलंब करावा. 2. पोंभुर्णाकडून चंद्रपूरकडे जाण्याकरीता
करसगटा – नवीन गंगापूर – बोर्डा फाटा – बोर्डा दीक्षित – बोर्डा (बोरकर) टी पॉईंट –
उमरी टी पॉईंट – बोर्डा गाव – गोपाल नगर टी पॉईंट ते चंद्रपूर या मार्गाचा अवलंब
करावा. 3. मुल कडून पोंभुर्णा किंवा गोंडपिपरी जाण्याकरीता देवाळा – थेरगाव –
सेलूर नागरेडी – वेळवा गाव – पोंभुर्णा या मार्गाचा वापर करावा. 4. तसेच
पोंभुर्णाकडून मूलकडे जाण्याकरीता वेळवा गाव – सेलूर नागरेडी – थेरगाव – देवाळा –
मूल या मार्गाचा वापर करावा.
सदर आदेशाचे पालन करून सर्व वाहतुकदारांनी
प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी
केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment