Search This Blog

Friday 20 September 2024

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ

 





शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ

चंद्रपूरदि. 20: राज्यातील नामंकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापन करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 24 महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू झाले आहे.  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते (आज दि.20) रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयचंद्रपूर येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला.

यावेळीजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमेनियामक मंडळाचे अध्यक्ष रामपाल सिंगशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत वाशिमकरसमन्वयक डॉ. गणेश चव्हाण तसेच अभियांत्रिकीचे विद्यार्थी उपस्थित होते.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आले असून या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण 150 युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात 15 ते 45 वयोगटातील दरवर्षी साधारण 1 लाख 50 हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.

ही आहेत जिल्ह्यातील महाविद्यालये :

 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे जिल्ह्यातील 24 महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू झाले आहे.  या केंद्रामधून कौशल्य विकासाबाबत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात ‍1. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती2. निलकंठराव शिंदे सायन्स ॲन्ड आर्ट कॉलेज भद्रावती3. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ब्रम्हपुरी4. डॉ. ज्ञानरत्न ‍सिव्हिल सर्विस कॉलेज भद्रावती5. शासकीय अभियांत्रिकी कॉलेज चंद्रपूर6. गुरुसाई पॉलिटेक्निक कॉलेज चंद्रपूर7. चिंतामणी कला व विज्ञान कॉलेज गोंडपिंपरी8. श्री ज्ञानेश महाविद्यालय सिंदेवाही9. रामचंद्रराव धोटे कला व वाणिज्य महाविद्यालय राजुरा10. राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर11. सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर12. शुरवी महिला महाविद्यालय मुल13. श्री. साई आयटीआय भद्रावती14. डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टकॉमर्स ॲण्ड सायन्स चंद्रपूर15. स्व. गोपालराव वानखडे जुनियर कॉलेज बल्लारपूर16. मानवटकर कॉलेज ऑफ फार्मसी घोडपेठता. भद्रावती17. महाराष्ट्र  इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डी. फार्म ब्रम्हपुरी18. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजनियरींग रिसर्च ॲण्ड टेक्नॉलॉजी चंद्रपूर19. अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चंद्रपूर20. अशोका नर्सिंग कॉलेज चंद्रपूर21. सेंट पॉल नर्सिंग कॉलेज बामणी बल्लारपुर22. प्रभादेवी स्कुल ऑफ नर्सिंग चंद्रपूर23. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॅालेटेक्नीक कॉलेज बेटाळा ब्रम्हपुरीआणि महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट (डी फार्म)अशा एकूण 24 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्रामधून कौशल्य विकासाबाबत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

0000000

No comments:

Post a Comment